Interesting Facts : पाण्याच्या बाटलीवर अशा Lines का असतात?

बऱ्याचदा या अशा गोष्टी आपल्याला निरर्थक वाटतात. पण, त्यांच्यामागे असणारं शास्त्रीय कारण समोर येतं तेव्हा मात्र धक्का बसतो 

Updated: Nov 2, 2022, 02:44 PM IST
Interesting Facts : पाण्याच्या बाटलीवर अशा Lines का असतात?  title=
why do plastic water bottles have Lines on it

why do water bottles have Lines on it : एखाद्या ठिकाणी प्रवासाला गेलं असता किंवा मग काही कारणानं घराबाहेर पडलं असता, आपण सहजपणे तहान लागली असता दुकानातून पाण्याची बाटली खरेदी करतो. पाणी पिऊन झाल्यानंतर आपण ती एकतर कचऱ्यामध्ये फेकतो किंवा तिचा पुन्हा वापर करण्यासाठी घरी आणतो. कधी याच पाण्याच्या बॉटलला तुम्ही निरखून पाहिलंय? 

बाटलीची एकंदर आखणी पाहिलं असता विविध कंपन्यांच्या बाटल्यांमध्ये एकच साम्य तुम्हाला दिसेल. हे साम्य म्हणजे या बाटल्यांवर असणाऱ्या रेषांचं. विकत घेतलेल्या पाण्याच्या बाटलीवर असणारी प्रत्येत गोष्ट ही ती बाटली आकर्षक दिसण्यासाठीच असेल असा जर तुमचा समज असेल तर तसं नाहीये. 

कंपनीप्रमाणे पाण्याच्या बाटलीवर असणारं डिझाईन (Design) बदलतं. त्याचप्रमाणे या रेषाही बदलतात. बऱ्याच बॉटल्सवर आडव्या रेषा असतात. या रेषांमागे एस शास्त्रीय कारण आहे. पाण्याची बाटली तयार करण्यासाठी सॉफ्ट प्लास्टिकचा (Soft Plastic) वापर होतो. परिणामी अशा रेषा असल्यामुळे बाटली आणखी मजबूत होते. 

अधिक वाचा : 'या' देशात प्रत्येकाच्या वाट्याला 2 नोकऱ्या; तरुणाई म्हणतेय थांबा आम्हीपण आलोच 

सोप्या शब्दांत सांगावं तर, जर या रेषा (Lines) नसलीत तर बाटली सहजपणे दुमडू शकते. अनेकदा ती हवेच्या दाबामुळे फुटण्याचाही धोका असतो. या एका कारणाव्यतिरिक्त रेषा असल्यामुळे बाटली पकडणं सोपं होतं. जर ती पूर्णपणे सपाट असेल तर हातातून सटकून पडून फुटण्याचाही धोका असतो. सरतेशेवटी येऊया आकर्षणाच्या मुद्द्याकडे. हो, पाण्याच्या बाटलीवर असणाऱ्या या रेषा पाहणाऱ्यांचं लक्षही वेधतात. आहे की नाही या रेषांची कमाल?