Viral Model News: सध्या जगाभरात मॉडेलिंगलाही (Modeling) खूप वेगळं महत्त्व निर्माण झालं आहे. मुलीही या क्षेत्रात करिअर म्हणून पाहू लागल्या आहेत. सध्या सोशल मीडियामुळे (Social Media) तर या क्षेत्राला वेगळीच गती प्राप्त झाली आहे. परंतु यातील अनेक मॉडेल्स या प्रसिद्धीच्या झोतात आल्यानंतर त्यांच्या अनेक सवयीही व्हायरल होतात. मग त्या चांगल्या असोत किंवा वाईट. सध्या अशाच एका मॉडेलची चर्चा आहे. ही मॉडेल वर्षातून फक्त 37 वेळा आंघोळ केल्याचा (37th times bath) विक्रम केला आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मॉडेल नक्की कोण आहे आणि तिनं असं का बरं केलं? नुसती बातमी वाचूनच आपलं गमतीनं हसायला लागतो. परंतु तिनं असं करण्यामागचं जरा का तुम्ही कारणं ऐकलंत तर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का (Shocking News) बसल्याशिवाय राहणार नाही. सध्या ही मॉडेल याच कारणानं विशेष चर्चेत आली आहे. (world news these model took bath only 37 times read why america model ella viral trending)
आपण वर्षातून किती वेळा आंघोळ करत असून हे गणित काही आपल्याला समजणार नाही. 365 दिवस या अर्थानं रोज आंघोळीचा विचार केला तर 365 वेळा आपण वर्षातून आंघोळ करतो. ्त्यातून दिवसातून दोनदा किंवा किती वेळा आंघोळ करतो त्यानूसार गणितं वेगळं परंतु या मॉडेल केवळ 37 वेळा म्हणजे 37 दिवसचं आंघोळ केली आहे. यामागचं कारणंही तिनंच स्पष्ट केलं आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, ही एक अमेरिकन मॉडेल आहे आणि तिचं नावं एला असं आहे. याबद्दल एका संवादात तिनं असं म्हटलं होतं की, तिनं 2022 साली फक्त 37 वेळाच आंघोळ केली आहे आणि तिनं काही गोष्टींचं पथ्य पाळलं आहे. तिच्या म्हणण्यानूसार, मी जरी 37 वेळा आंघोळ केली असली तरी मी योग्य त्या हायजीनचं (Hygine) पालन केलं असून योग्य तऱ्हेनं स्वच्छताही पाळली आहे. त्यामुळे मी आंघोळ इतक्या कमी वेळा केली असली तरी मी स्वच्छतेचे पालन केलं आहे, असं तिनं म्हटलं आहे.
एलानं सांगितल्यानुसार तिला तिची नैसर्गिक त्वचा (Natural Skin) चांगली ठेवयाची आहे त्यासाठी ती कमी वेळा आंघोळ करते. त्याचसोबत ती म्हणाली की, जर मी जास्त वेळा आंघोळ केली तर माझ्या शरीरातून घाण वास येयला लागतो, असं धक्कादायक उत्तर तिनं दिलं आहे. त्याचसोबत असं केल्यानं तिची स्कीन खूप ग्लो राहते असं तिचं निरिक्षण आहे.
हेही वाचा - फोटोग्राफर्सना पाहताच Riteish-Genelia मुलांसह करतात नमस्कार! मुलांवरील संस्कार पाहून नेटकरी म्हणाले...
ती रोज आंघोळ करत नसल्यानं ती आपल्या शरीराला स्वच्छ कसं ठेवते यावरही तिचं स्पष्ट केले, ती म्हणाली, मी वेगवेगळ्या प्रकारानं माझ्या शरीराला स्वच्छ ठेवण्यासाठी क्लेझिंग (Cleansing) करते. असं कारण्यामागचं कारणंही तिनं स्पष्ट केले. ती म्हणाली की, मी एक मेडिकल कॅम्पला गेले होते तेव्हा मला या गोष्टींबद्दल प्रकर्षानं कळलं तेव्हापासून मी असं करायला सुरूवात केली.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्या).