J K Rowlings Death Threat: हॅरी पॉटरच्या प्रसिद्ध लेखिका J. K. Rowling यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची बातमी समोर आली आहे. J. K. Rowling यांनी लेखक सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला म्हणून त्यांना ही धमकी आल्याचे कळते आहे.
रश्दी यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना ते जीवे मारण्याची धमकी...
J. K. Rowling यांनी 75 वर्षीय सलमान रश्दी यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करत एक ट्विट शेअर केलं होतं. ज्यात त्यांनी रश्दी यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली होती. त्यांच्यावरील भ्याड हल्ल्याचाही निषेध केला होता. याच पोस्टवर कमेंट करत एका व्यक्तीने थेट J. K. Rowling यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ''काळजी करू नका आता पुढचा नंबर तुमचाच आहे", असं या कमेंटमध्ये लिहिलं आहे.
धमकीवर जे के रोलिंग्स यांची प्रतिक्रिया..
या ट्विटचा संपुर्ण स्क्रीनशॉट J. K. Rowling यांनी शेअर केला आहे. सदर प्रकाराची दखल घेण्याचं आवाहन देखील लेखिकेनं केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये ट्विटर सपॉर्टला उद्देशून असे लिहिले आहे की...
.@TwitterSupport These are your guidelines, right?
"Violence: You may not threaten violence against an individual or a group of people. We also prohibit the glorification of violence...
"Terrorism/violent extremism: You may not threaten or promote terrorism..." pic.twitter.com/BzM6WopzHa
— J.K. Rowling (@jk_rowling) August 13, 2022
न्युयॉर्कच्या एका व्याख्यानादरम्यान रश्दी यांच्यावर हादी मातर नामक एका व्यक्तीने 15 वेळा चाकूने वार केले. रश्दी यांच्या यकृताला आणि डोळ्याच्या भागालाही जबर मार लागला आहे. त्यांचा एक डोळा गमवण्याची भिती आहे. या हल्ल्यानंतर तातडीने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार रश्दी यांना व्हेंटिलेटरवर काढण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे बोलले जाते आहे. रश्दी यांच्यावर वार केलेल्या हल्लेखोरला पोलिसांनी तब्यात घेतले असून पुढील पोलिस कारवाई सुरू आहे.
रश्दी यांच्या ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ या पुस्तकावर बंदी घालण्यात आली आहे. या पुस्तकावरून सलमान रश्दी हे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.