जोडीदाराकडून होतेय तुमची फसवणूक? 'या' कारणांमुळे वाढतेय Extramarital affairs ची संख्या

विश्वास ठेवावा की नाही? ज्याच्यावर प्रेम केलं त्याचीच करताय फसवणूक...  Extramarital affairs  साठी हेच ठरतंय कारण  

Updated: Nov 17, 2022, 02:31 PM IST
जोडीदाराकडून होतेय तुमची फसवणूक? 'या' कारणांमुळे वाढतेय Extramarital affairs ची संख्या  title=

Extra Marital Affair : लग्न म्हणजे साता जन्माचं नातं मानलं जातं. लग्नानंतर फक्त मुलीचं नाही तर, मुलाचं देखील आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. आपला संसार उत्तम असावा अशी दोघांची इच्छा असते. पण या सगळ्या गोष्टींआधी पती-पत्नीच्या नात्यात प्रेम असावं लागतं. प्रेम आधारलेलं असतं विश्वास, भावना आणि आदर या तीन गोष्टींवर... नात्यात या तीन गोष्टी नसतील तर पती-पत्नीचं नाही तर, कोणतीही नातं जास्त काळ टिकणार नाही. 

पती-पत्नीच्या नात्यात दोघांना एकमेकांकडून आदर आणि प्रेम हवा असतो. नात्यात सुरुवातीला सगळं काही सुरळीत चालू असताना आपला जोडीदार फसवत आसल्याचं कळालं तर? आपल्या आयुष्यात असं काही घडेल असा कोणी विचार पण नाही करणार. पण आता Extramarital Affair ची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. (warning signs of extramarital affairs)

का वाढतेय Extramarital Affair ची संख्या

अतीघाईने घेतलेला लग्नाचा निर्णय 
अनेकदा समाज किंवा कुटुंबाच्या दबावाखाली अनेकांना लग्न करावं लागतं. अशा नात्यात पती-पत्नीला एकमेकांविषयी भावना आणि प्रेम वाटत नाही. अखेर दोघे विवाहबाह्य संबंधांकडे वळतात. 

एकमेंकावर लादलेला दबाव
पती-पत्नीच्या नात्यात दोघांना एकमेकांवर हक्क असतो. पण जेव्हा हक्कांचं रुपांतर दबावात होतं, तेव्हा दोघांना नात्याचं ओझ वाटू लागतं. त्यामुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण होतो. 

शारीरिक समाधान
शारीरिक समाधान न मिळाल्याने विवाहबाह्य संबंधांची प्रकरणे वाढत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. लग्न मोडण्याचं हे देखील एक प्रमुख कारण आहे. (extra marital affairs law in india)

एकमेकांच्या निवडीचा आदर न करणं 
काही जोडप्यांमध्ये एकमेकांच्या आवडी-निवडी पूर्णपणे वेगळ्या असतात. त्यामुळे जोडीदाला या गोष्टीची अडचण होते. अशा परिस्थितीत एकमेकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन तडजोड केली जाऊ शकते, परंतु सहसा अशा जोडप्यांमध्ये भांडणं होतात. 

आजार
जर एखाद्याला गंभीर आजार असेल तर त्याचा जोडीदार जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही आणि तो दुसऱ्या मुलगा / मुलीकडे आकर्षित होतो. (can extramarital affairs be true love)