तुकोबांच्या पालखीचं बेलवडीत पहिलं गोल रिंगण...तर माऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण चांदोबाचं लिंब इथं संपन्न

संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण लोणंद पासून सात किलोमीटरवर असलेल्या चांदोबाचं लिंब या ठिकाणी संपन्न झालं. हा सोहळा अनुभवण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक एकवटला होते. 

Updated: Jun 20, 2023, 07:18 PM IST
तुकोबांच्या पालखीचं बेलवडीत पहिलं गोल रिंगण...तर माऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण चांदोबाचं लिंब इथं संपन्न title=

विशाल सवने, झी मीडिया : संत तुकाराम महाराजांची पालखीचं (Tukaram Maharaj Palakhi) बेलवडी इथं पहिलं गोल रिंगण आज सकाळी संपन्न झालं. त्यानंतर पालखी लासुर्णे मार्गे अंथुर्णेत विसावेल. तर संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचं (Dyaneshwar Mauli Palakhi) पहिलं उभं रिंगण चांदोबाचं लिंब इथं मोठ्या उत्साहात पार पडलं. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दुपारी लोणंद इथून तरडगावकडे मार्गस्थ झाली. लोणंद होऊन काही किलोमीटर अंतरावर चांदोबाचा लिंब या ठिकाणी पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण भक्तीमय वातावरणात पार पडलं. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी चांदोबाचा लिंब मंदिराच्या समोर येताच चोपदारांनी रिंगण लावले. त्यानंतर मानाच्या दिंड्या रथाच्या दोन्ही बाजूला समांतर समोर उभ्या राहिल्या.

रिंगण स्थळी मानाचे अश्व पोहोचले. एका आश्वावर स्वार बसलेला होता तर दुसरा अश्वावर कोणीही बसलेल्या नव्हतं. ज्या अश्वावर कुणी बसलेले नसतं तो अश्व माऊलींचा अश्व आहे अशी भावना वारकऱ्यांची असते. त्याशिवावर स्वतः माऊली विराजमान आहेत अशी वारकऱ्यांची भावना आहे. संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पादुकांना नमन करून अश्वानी रिंगण स्थळी दौड घेतली. रिंगण संपल्यानंतर अश्वंच्या टापा खालची माती कपाळी लावण्यासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. 

या सोहळ्याला फक्त वारकरीच नव्हे तर आसपासच्या परिसरातील भाविक वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित झाला होता. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज तरडगावच्या मुक्कामी आहे.

दरम्यान, बारामतीत संत सोपान काका महाराज पालखीचे दुसरे रिंगण माळेगाव येथे उत्साहात साजरे झालं. संत सोपान काका महाराज पालखी सोहळा बारामती तालुक्यातील माळेगाव इथं आल्यानंतर पालखीचे ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलं. त्यानंतर सोपान काका पालखीचे दुसरे गोल रिंगण उत्साहात साजरे झाले हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. 

मंदिर 24 तास खुलं राहाणार

विठुरायांच्या पदस्पर्शासाठी भाविकांनी पंढरपुरात गर्दी केलीय. दर्शनासाठी तब्बल 7 तास लागतातेय. रांगेतील भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनानं खबरदारी घेतलीय. ढरपुरातलं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आजपासून 24 तास दर्शनासाठी खुलं राहणार आहे. आषाढीसाठी येणा-या लाखो भाविकांना दर्शन घेता यावं यासाठी देवाचा चांदीचा पलंग काढून मंदिर दर्शनासाठी 24 तास खुलं करण्यात आलंय. आजपासून देवाचे राजोपचार बंद असणारेत. 7 जुलैपर्यंत विठोबा-रखुमाईचं दर्शन भाविकांना 24 तास घेता येणार आहे. तसंच आषाढी एकादशी काळात भाविकांना देवाचं दर्शन सुखकर होण्यासाठी, मंदिर समिती आणि प्रशासनाकडून विशेष उपाययोजनाही करण्यात आल्यात.