न्यूयॉर्क कोर्टानं फेटाळले देवयानीवरचे आरोप

भारताच्या अमेरिकेतल्या माजी अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना दिलासा मिळालाय. अमेरिकेच्या न्यूयॉर्क कोर्टाने देवयानी यांच्यावरील आरोप फेटाळलेत.

भाजपची बैठक, मोदी कुठून लढणार लोकसभा निवडणूक?

लोकसभा उमेदवारांची तिसऱ्या यादीसंदर्भात आज भाजपची महत्त्वपूर्ण बैठक होतेय. त्यासाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. या बैठकीसाठी भाजपचे सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित असतील.

भररस्त्यात तरुणीचे कपडे फाडले, लोक पाहत राहिले...

वर्दळीच्या रस्त्यावर भरदिवसा एका तरुणीचे अंगावरचे कपडे फाडले जातात... आणि आजुबाजुचे लोक केवळ तमाशा पाहत उभे राहतात... हे चित्र पाहायला मिळालं महिलांसाठी सुरक्षित समजल्या जाणाऱ्या मुंबई शहरात...

'त्या' बेपत्ता विमानाचे सॅटेलाईट फोटो जाहीर...

चीन सरकारच्या वेबसाईटवर मलेशिया एअरलाईन्सच्या बेपत्ता विमानाचे काही सॅटेलाईट फोटो जाहीर करण्यात आलेत. याच ठिकाणावर हे विमान कोसळल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

हिमालय भाड्याने देणे आहे...

लवकर खाजगी कंपन्यांना हिमालय भाड्याने मिळण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. टूरिझमसाठी नेपाळ सरकार सध्या या पर्यायाचा विचार करत आहे.

आता, बँकाही लावणार खिशाला चाट!

पुढच्या महिन्यापासून तुमच्या खिशावरचं ओझं आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण, येत्या १ एप्रिलपासून अनेक बँका आपल्या विविध सेवांवर शुल्क वाढवण्याच्या तयारीत आहेत.

मॅड इन इंडियामध्ये दिसणार `अभि-अॅश`?

अगोदर गुत्थी बनून प्रेक्षकांकडून वाहवा लुटल्यानंतर आता कॉमेडीयन सुनील ग्रोवर आपल्या `मॅड इन इंडिया`मधून `चुटकी`च्या रुपात सगळ्यांना हसवाया प्रयत्न करतोय.

भारतात प्रवेश करायचाय तर पोलिओ लस अनिवार्य!

१५ मार्चपासून पाकिस्तानातून भारतात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पोलिओची लस घेतल्याचं प्रमाणपत्र देणं अनिवार्य असेल, अशी घोषणा आज भारतानं केलीय. त्यामुळे पोलिओमुक्त भारतात पुन्हा या रोगाचा शिरकाव होणार नाही.

`दुसऱ्या विवाहासाठी पत्नीची मंजुरी गरजेची नाही`

धार्मिक मुद्यांवर सरकारसमोर कायदेशीर मतं मांडणाऱ्या पाकिस्तानच्या एका संविधानिक संस्थेच्या म्हणण्याप्रमाणे, कोणत्याही पुरुषाला दुसरा विवाह करण्यासाठी सध्याच्या पत्नीच्या परवानगीची आवश्यकता नाही.

शेवटच्या दिवशी मतदार झाले जागे!

राज्यामध्ये रविवारी राबवण्यात आलेल्या विशेष मतदार नोंदणीला मोठा प्रतिसाद मिळालाय. एकाच दिवशी तब्बल ६ लाख ८८ हजार नागरिकांनी मतदार नोंदणी केलीय.