दयाशंकर मिश्र : जर-तर असं झालं असतं, असं झालं नसतं. तो माझ्या जीवनात आला नसता. मी त्या गल्लीतून गेलो नसतो. मी जर ती नोकरी सोडली नसती. किती चांगलं झालं असतं, जर मी त्याला जाऊ दिलं नसतं...
भूतळातल्या किती किती आठवणी आहेत. भूतकाळाच्या आठवणी आपल्यासाठी खूप प्रिय असतात. पण वर्तमानाच्या अंगणात थोडासाही उन्हाचा चटका लागला की, आपण पुन्हा भूतकाळाच्या गल्लीत जाऊन रमतो. जीवनाला जर तरच्या तराजूत तोलण्याचा प्रयत्न तेव्हा आपण करतो. एवढं माहित असूनही की जीवनात कोणताही रिप्ले नसतो.
जीवनाएवढा 'लाईव्ह' कुणीच नसतो. येथे सर्व काही वर्तमानाच्या क्रीजवर होतं. एक वेळा रन-आऊट झाल्यानंतर, तुमच्यावर अवलंबून असतं की, तुम्ही संपूर्ण जीवन त्याचा रिप्ले पाहून, आठवून, जर-तर करून जगायचं, की त्याच्यात काही तरी शिकून पुन्हा रन-आऊट न होण्याची काळजी घ्यायची.
जिंदगी एवढं रोमांचक, धोकायदायक वळणावर आहे की, येथे लाख वेळा शिकवण घेतल्यानंतरही मोठ्यातल्या मोठ्या, महान खेळाडूवर देखील रन-आऊट होण्याचं संकट घोंगावत असतं.
तेव्हा अंतर्मनात ही गोष्ट पोहोचणे गरजेचे आहे की, जीवनाला एका संपूर्ण तयारीने जगण्याचा प्रयत्न म्हणजे, खरं तर जीवनाच्या सौंदर्यांशी खेळ करण्यासारखं आहे. तसं पाहिलं तर संपूर्ण तयारी अशा गोष्टीला काही महत्व नसतं.
उदाहरणार्थ तुम्ही मणीपूरच्या यात्रेची संपूर्ण तयारी करून पोहोचले, पण तेथे गेल्यानंतर लक्षात आलं की, रेल्वेचं काही कारणामुळे रद्द करण्यात आली आहे.आता हे तर स्पष्ट आहे की, तुम्ही मणीपूरला जावू शकत नाहीत.
कारण ही रेल्वे गाडी देखील साप्ताहिक होती. विमानाच्या तिकीटाएवढी आपली ऐपत नाही. यामुळे ऑफिसने सुटी दिली तरी तुमचा प्रवास होणं शक्य नाही. या तुमचा कोणताच दोष नाही, ही यात्रा पूर्ण करण्यासाठी जे टप्पे तुम्हाला पूर्ण करायचे होते. तेच अपूर्ण राहिले, त्यात तुमचा दोष तरी काय?
समजणं थोडं कठीण आहे, पण जीवनाचा सार हाच आहे, जीवन जे आहे, जसं आहे, तसं स्वीकारणं, त्याच्यावर प्रेम करणं, जीवनाला स्नेह आत्मियतेच्या रंगानी भरून काढणं, आपलं पहिलं काम आहे, हे 'रंगकर्म' मानवतेशिवाय शक्य नाही.
एक मित्र आहे, त्याची प्रत्येक गोष्ट जर-तर पासून सुरू होते. तो वर्तमानात थांबतच नाही, तो नेहमी भूतकाळाला चिटकून, भविष्याला घाबरत असतो. या जर-तर सिंड्रोमचा असा परिणाम झाला की, तो आलेल्या संधीला घाबरू लागला. जीवनात कोणत्याही आलेल्या कामाला करण्यात तो घाबरू लागला...
जर तुमचेही असे मित्र असतील, शुभचिंतक आहेत, तर सर्वात आधी एक काम करा, त्यांच्या या प्रभावापासून स्वत:ला मुक्त करा. कारण याचा थेट परिणाम तुमच्या चिंतन प्रकियेवर होत असतो.
तुमच्या निर्णयांना जर-तरच्या नजरेने पाहणे बंद केलं पाहिजे. भूतकाळातून शिकणं एक स्मार्ट सवय असू शकते. पण असं पाहण्यात आलं आहे की, हे एका सिंड्रोममध्ये बदलंल आहे.
आणि जिथ पर्यंत भविष्याचा प्रश्न आहे, ते अनंत, अनिश्चित आहे. म्हणून त्याची चिंता करत बसू नका. फक्त एवढंच करा, आजमध्ये जगण्याची सवय विकसित करा.
जो आज आहे, तिच एक मौज आहे. ही गोष्ट ज्याने समजून घेतली, तो प्रत्येक जगातील प्रत्येक प्रकारच्या भीतीपासून मुक्ती मिळेल.
(लेखक 'झी न्यूज़'चे डिजिटल एडिटर आहेत) (https://twitter.com/dayashankarmi)
(आपले प्रश्न आणि सूचना इनबॉक्समध्ये लिहा: https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)