फणसाच्या झाडांची लागवड करा आणि चांगला नफा कमवा...

शेतकऱ्यांना चांगला नफा कमवायचा असेल तर फणसाची लागवड करु शकता. पाहा कधी आणि कशी करावी याची लागवड.

Updated: Aug 3, 2022, 12:17 AM IST
फणसाच्या झाडांची लागवड करा आणि चांगला नफा कमवा... title=

पोपट पिटेकर, मुंबई : फणसाच्या पिकांची भारतात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. महाराष्ट्रातील कोकणात तर मोठ्या प्रमाणात फणसाची शेती करताना पाहायला मिळतं. फणसाला जगातील सर्वात मोठे फळ देखील म्हटलं जातं. फणसात लोह, कॅल्शियम आणि पोटॅशियमसारखे घटक असतात. जे निरोगी राहण्यासाठी फायदेशीर ठरतात. 

उष्ण आणि दमट हवामान हे फणस पिकांच्या लागवडीसाठी योग्य मानलं जातं. त्याची झाडे उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात सहजपणे वाढतात. असं असलं तरी थंडीत पडणारे तुषार त्याच्या पिकांसाठी हानिकारक ठरतात. यासोबतच 10 अंशांपेक्षा कमी तापमान हे झाडांच्या वाढीसाठी घातक ठरतं. फणसाचं झाड एकदा तयार झालं की अनेक वर्षे उत्पादन देतं. 

फणसाची लागवड कुठे कराल?

फणसाच्या झाडांची लागवड हे तुम्ही कुठेही करु शकता आणि कोणत्याही जमिनीत करु शकता. परंतू चिकणमाती असेल तर सर्वात उत्तम. याव्यतिरिक्त जमीन ही जलमय होणार नाही. याची विशेष काळजी देखील घेतली तर झाडांची लागवड योग्य होईल. तिच्या लागवडीतील जमिनीची P.H.मूल्य हे सुमारे 7 असणं गरजेचं आहे. फणसाची लागवड हे जून ते सप्टेंबर महिन्यात तुम्ही उत्तम रित्या करु शकता. 

हवामान किती आवश्यक?

फणसाच्या झाडांची रोपे हे उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात सहज रित्या वाढतात. फणसाच्या पिकासांठी उष्ण आणि दमट हवामान योग्य मानले जाते. परंतू थंडीत पडणारे दव हे फणसांच्या पिकांसाठी हानिकारक ठरतात. यासोबतच 10 अंशांपेक्षा कमी तापमान फणसांच्या झाडांच्या वाढीसाठी हानिकारक ठरतो. फणसाच्या झाडांची रोप तयार झाले की ते अनेक वर्षे तुम्हाला उत्पादन देते. 

फणसाच्या फळांचा उपयोग?

फणसांच्या झाडापासून फळ तयार झाली की त्याचा वापर अनेक ठिकाणी केला जातो. मध्यमवयीन फळे, जी भाजीसाठी वापरली जातात. तसेच देठ गडद हिरव्या रंगाची, लगदा कडक आणि गाभा मऊ  असताना फणसाची काढणी करावी. याशिवाय, जर तुम्हाला फणसाच्या पिकलेल्या फळांचे सेवन करायचे असेल तर ते फळानंतर सुमारे 100 ते 120 दिवसांनी तोडणी करणं गरजेचं आहे.

किती नफा कमवू शकता?

फणसाच्या फळापासून तुम्ही मोठ्या प्रमाणात पैसे कमवू शकता. तुम्ही जर फणसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली तर शेतकऱ्यांना वर्षाला 8 ते 10 लाखांचा नफा सहजपणे मिळू शकतो.