मुंबई : आलिया भट आणि वरुण धवन पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार आहे. निर्माता करण जौहरच्या शुध्दी या महत्त्वाकांक्षी सिनेमात ही जोडी एकत्र येणार आहे. अनेक वर्षांपासून हा सिनेमा रखडला होता.
आधी हृतिकने आणि मग सलमानने हा सिनेमा सोडल्यामुळे सिनेमाच्या निर्मितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला होता. मात्र अखेर या सिनेमाच्या शूटला सुरुवात होणार असल्याची माहिती धर्मा प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता यांनी दिली आहे. करन मल्होत्रा या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे.