फोटो : हार्दिक पांड्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

हार्दिक पांड्याने इंन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे.

Updated: Oct 5, 2019, 12:13 PM IST
फोटो : हार्दिक पांड्यावर यशस्वी शस्त्रक्रिया title=
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

लंडन : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज, ऑलराउंडर खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) लवकरच क्रिकेट संघात परतू शकतो. हार्दिकवर लंडनमध्ये पाठीची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. गेल्या एक वर्षापासून हार्दिक या दुखापतीने त्रस्त होता. पांड्याने सोशल मीडियावर एक  फोटो शेअर करत चाहत्यांना याबाबत माहिती दिली.

हार्दिक पांड्याने इंन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसह त्याने, शस्त्रक्रिया यशस्वीपणे झाली. सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद मानत, त्याने लवकरच परत येईल असं म्हटलंय.

 
 
 
 

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

हार्दिकला झालेली ही दुखापत जुनी आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये यूएईमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या Asia Cupदरम्यान पांड्याच्या पाठीला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला स्ट्रेचरवरुन मैदानबाहेर आणण्यात आले होते. या दुखापतीनंतर तो स्पर्धेबाहेर झाला होता.

दरम्यान, हार्दिक या दुखापतीतून वेळेवर सावरला होता. त्याने नंतर आयपीएल आणि इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या विश्वचषक स्पर्धेतही भाग घेतला होता. परंतु दक्षिण अफ्रिकेविरुद्ध टी-२० सामन्यादरम्यान त्याला पुन्हा पाठीचा त्रास होऊ लागला. त्यानंतर त्याने यावर लंडनमध्ये इलाज करण्याचा निर्णय घेतला. अखेर त्यावर आता यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

हार्दिक पांड्याशिवाय, जसप्रीत बुमराहदेखील दुखापतीमुळे संघाच्या बाहेर आहे. तो पुढील महिन्यात संघात परतण्याची शक्यता आहे.