close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

विजय शंकरच्या बॅटिंगवर चाहत्यांची नाराजी; सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस

पाकिस्तानसमोर ३३७ धावाचं आव्हान

Updated: Jun 16, 2019, 08:27 PM IST
विजय शंकरच्या बॅटिंगवर चाहत्यांची नाराजी; सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस

मुंबई : आज मॅन्चेस्टरमध्ये विश्वचषकातील सर्वात महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याला सुरुवात झाली. पाकिस्तानने टॉस जिंकून सर्वप्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला. पहिल्या खेळीमध्ये भारताने मोठी धावसंख्या करत पाकिस्तानला ३३७ धावाचं आव्हान ठेवलं आहे. भारताची फलंदाजी झाल्यानंतर चाहत्यांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. शेवटच्या २० धावांमध्ये विजय शंकरने केलेल्या धावांच्या खेळीवर अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

विजय शंकरला २०० स्ट्राईक रेटने खेळणं शक्य नाही त्यामुळे ऋषभ पंतला संधी देण्याची मागणी क्रिकेट रसिकांकडून होत आहे. आतापर्यंत केवळ ५ वनडे खेळलेल्या विजय शंकरची टीममध्ये निवड झाल्यानेही क्रिकेट चाहत्यांची निराशा झाल्यचेही मत चाहत्यांनी व्यक्त केले आहे. 

#Cricket२४तास - वाचा चाहत्यांच्या प्रतिक्रिया

अजय पांचाळ - यापेक्षा रविंद्र जडेजाला संधी मिळाली पाहिजे होती.
कृणाल चंद्रशेखर - बरं झालं विजय शंकर खराब खेळला, पुढच्या मॅचमध्ये कार्तिकला संधी मिळेल. 
प्रवीण घाणेकर - विजय शंकरकडून २०० चा स्टाईक रनरेट शक्य नाही, त्यापेक्षा ऋषभ पंत बरा.
दीपक पवार - विजय शंकरपेक्षा दिनेश कार्तिकला घ्यायला पाहिजे होते.
गंधार भंडारी - फक्त ५ वनडे सामने खेळलेल्या विजय शंकरला टीम इंडियात संधी, निवड़ समितीला कोपरापासून दंडवत
सूरज काळे- दिनेश कार्तिक सर्वोत्तम.
सोमनाथ शेरे - एखाद्या जंगली खेळाडूनेही पाच पन्नास रन्स काढल्या असत्या.
आकाश शिंगणावद - शेवटच्या २० चेंडूत भंगार खेळी.
गणेश पट्टेवाड - विजय शंकरला टीमच्या बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे.
शशीकांत ढोबळे-पाटील - विजय शंकरच्या जागी दिनेश कार्तिक हवा होता.
रोहित पाटील - ऋषभ पंत टीममध्ये हवा होता.