ना जीम, ना औषधं तरीही 4 महिन्यात कमी केलं 27 किलो वजन; त्याचा Diet Plan अगदीच सोपा

Weight Loss News: या तरुणाने अवघ्या चार महिन्यामध्ये 27 किलो वजन कमी केलं. या कालावधीमध्ये हा तरुण दिवसातून तीन टाइम नेमकं काय जेवण घ्यायचा पाहा

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 8, 2025, 11:13 AM IST
ना जीम, ना औषधं तरीही 4 महिन्यात कमी केलं 27 किलो वजन; त्याचा Diet Plan अगदीच सोपा title=
आधीचा आणि आताचा फोटो (सौजन्य इन्स्टाग्रामवरुन साभार)

Weight Loss News: फिटनेस ट्रेनर यतीनेश निरभवनी यांनी त्यांच्या एका क्लायंटची वजन कमी करण्यासंदर्भातील प्रगती कशी झाली याबद्दलची थक्क करणारी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये एका तरुणीने 100 दिवसांमध्ये 23 किलो वजन कमी केल्याचा दावा यतीनेश यांनी केला आहे. ज्या तरुणाने वजन कमी केलं आहे त्याचं नाव ओमर असं असून त्याने हे कसं केलं याबद्दलची माहिती यतीनेश यांनी दिली आहे.

120 दिवसात 27 किलो वजन कमी केलं

यतीनेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमर आधी 95 किलोंचा होता. त्याने फॅट लॉस डाएट सुरु केलं. त्याने 120 दिवसांमध्ये 27 किलो वजन कमी केलं आहे. आता ओमरचं वजन 68 किलो इतकं आहे. यतीने यांनी फॅट लॉस डाएट प्लॅनअंतर्गत तीन वेगवेगळ्या जेवणाचे पर्याय शेअर केले आहे. ओमरने याच गोष्टी खाऊन वजन कमी  केलं आहे. यतीनेश यांनी ओमर या 120 दिवसांच्या कालावधीमध्ये काय खात होता हे सांगितलं आहे.

जेवणात तो नेमकं काय खायचा?

ओमरला देण्यात आलेले जेवणाचे तीन पर्याय खालीलप्रमाणे:

1) उकडलेल्या अंड्यांचा पांढरा भाग, सफरचंदाच्या खापा, भिजवलेले बदाम
2) चपाती, दही, भाजी आणि डाळ
3) पनीर, चपाती, भाजी आणि काकडी

यतीनेश यांनी ओमरने चार महिने साखर सोडली होती असंही सांगितलं आहे. ओमर या कालावधीमध्ये दिवसाची सुरुवात जिरं घातलेलं कोमट पाणी पिऊन करायचा. पहिल्या जेवणार तो 50 ग्राम मसाला ओट्स, भाजलेले शेंगदाणे (30 ग्राम) आणि काकडी खायचा. दुसऱ्या जेवणामध्ये तो 2 मध्यम आकाराच्या चपात्या, सोयाबीन  चंक्स (50 ग्राम), काळ्या वटाण्याची भाजी (30 ग्राम) खायचा. दुसऱ्या जेवणात तो एक काकडीही खायचा. रात्रीच्या जेवणामध्ये तो 1 मध्यम आकारच्या वाटी भरेल एवढी हिरव्या मूगाची भाजी, 150 ग्राम भात, काकडी आणि गाजर खायचा.

प्रोटीन्सचा समावेश

ओमरच्या प्रत्येक जेवणामध्ये प्रोटीन्सचा समावेश करण्यात आलेला. वजन कमी करण्यासाठी प्रोटीन्स गरजेचे असतात. प्रोटीन्सच्या माध्यमातून संप्रेरकांबरोबरच रक्तप्रवाह कायम राहण्यासाठी महत्त्वाचा हातभार लागतो असं सांगितलं जातं.  

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)