मनू भाकर नेमबाजी सोडून क्रिकेट खेळणार? सूर्यासोबतचा फोटो शेअर करत असं काय म्हणाली?

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दुहेरी कांस्यपदक विजेती मनू भाकरने घेतली 'मिस्टर 360' ची भेट, फोटो सोशल मीडियावर व्हायरल. 

सोनेश्वर पाटील | Updated: Aug 25, 2024, 04:50 PM IST
मनू भाकर नेमबाजी सोडून क्रिकेट खेळणार? सूर्यासोबतचा फोटो शेअर करत असं काय म्हणाली?  title=

Manu Bhaker  Meet Suryakumar Yadav : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी दोन पदके जिंकून इतिहास रचणारी नेमबाज मनू भाकर आजकाल नवीन खेळांचे बारकावे शिकत आहे. नुकतीच तिने घोडेस्वारी, भरतनाट्यम आणि स्केटिंग शिकण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता ती थेट क्रिकेट शिकताना दिसत आहे. 22 वर्षीय मनू भाकरने रविवारी भारताचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादवसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. मनू भाकरने या फोटोसाठी एक अप्रतिम कॅप्शनही दिलं आहे. 

मनू भाकर कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, मी भारताच्या मिस्टर 360 सोबत नवीन गेमचे तंत्र शिकत आहे. फोटोमध्ये मनू बॅटिंग करतानाची पोज देताना दिसत आहे. संपूर्ण मैदानात खेळण्याच्या क्षमतेमुळे सूर्यकुमार यादवला मिस्टर 360 म्हटले जाते. दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स यांच्यामुळे हे नाव लोकप्रिय झाले होते. पॅरिसमध्ये इतिहास रचल्यानंतर मनू सध्या तीन महिन्यांच्या विश्रांतीवर आहे. आता ती भारतीय टी-20 कर्णधाराकडून क्रिकेट शिकत आहे. 

मनू भाकरने इतिहास रचला 

मनू भाकरने पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल आणि मिश्र 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत दोन कांस्यपदके जिंकून इतिहास रचला आहे. ऑलिम्पिक खेळांच्या एकाच आवृत्तीत दोन पदके जिंकणारी ती स्वातंत्र्यानंतरची पहिली भारतीय खेळाडू आहे. टोकिया 2020 ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरला निराशेचा सामना करावा लागला होता. जिथे ती तिच्या तिन्ही स्पर्धांमध्ये अंतिम फेरीत पोहोचू शकली नाही. 

मनू भाकरचा मिस्टर 360 सोबतचा फोटो व्हायरल 

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो पाहून चाहते देखील प्रचंड खूश झाले आहेत. चाहत्यांनी त्यांचे कौतुक देखील केले आहे. तर चाहत्यांनी मोठ्य प्रमाणात कमेंट्स देखील केल्या आहेत. एका चाहत्याने म्हटले आहे की, भारताचे दोन सुपरस्टार, आजचे सुंदर आणि प्रतीकात्मक चित्र, देव तुम्हा दोघांचे कल्याण करो.

याआधी देखील मनू भाकरला एका कार्यक्रमात नीरज चोप्राबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिला राग आला होता. या प्रश्नावर तिने काहीच उत्तर दिले नाही तर ती तिथून आईसोबत निघून गेली. त्यानंतर मनूचे वडील यांनी निवेदन दिले. ते म्हणाले की, मनू अजून लहान आहे. तिचे लग्नाचे वय नाही. ती याबद्दल विचारही करत नाही.