Shukra Gochar : शुक्र ग्रहाचा कन्या राशीत प्रवेश; 'या' राशींसाठी ठरणार अडचणींचा काळ

Shukra Gochar : ज्योतिषशास्त्रा अनुसार, शुक्र ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे. या  परिस्थितीत काही राशींना सावधपणा बाळगण्याची गरज आहे. 

Updated: Nov 1, 2023, 12:12 PM IST
Shukra Gochar : शुक्र ग्रहाचा कन्या राशीत प्रवेश; 'या' राशींसाठी ठरणार अडचणींचा काळ title=

Shukra Gochar In Kanya: ज्योतिषशास्त्रा अनुसार, दैत्यांचा गुरु शुक्र ग्रह एका निश्चित वेळेनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. याचा परिणाम प्रत्येक राशीच्या जातकाच्या आयुष्यावर पडतो. शुक्राला धन, ऐश्वर्य, सौंदर्य आणि वैभव यांचा स्वामी मानले जाते. 3 नोव्हेंबर 2023 रोजी, शुक्र सकाळी 4:58 वाजता, म्हणजेच दिवाळीपूर्वी बुधाच्या कन्या राशीत प्रवेश करत आहे. कन्या राशीत शुक्राचा प्रभाव अल्प आहे. अशा परिस्थितीत काही राशींच्या जीवनावर याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया शुक्राने  कन्या राशीत प्रवेश केल्याने कोणकोणत्या राशींना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. 

मेश रास 
या राशीमध्ये शुक्र सहाव्या घरात स्थित आहे. यामुळे मेश राशीच्या जातकांना जरा सांभाळून राहण्याची गरज आहे. शुक्राचा प्रभाव कमजोर असल्याने नात्यांवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. दांपत्यजीवनात काही अडथळे येऊ शकतात. काही गोष्टींमुळे वादविवाद होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. नोकरदार व्यक्तींनी सांभाळून राहावे. नोकरी बदलण्याचा विचार करत असल्यास त्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल. व्यापार क्षेत्रात असणाऱ्या व्यक्तींना कमी प्रमाणात नफा प्राप्त होईल. यासोबतच धनहानीचा योगही जुळून आला आहे. 

सिंह रास 
या राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर शुक्र दुसऱ्या घरात राहणार आहे. त्यामुळे सिंह राशीच्या जातकांना काही समस्यांना सामोरे जावे लागते. करियरमध्ये बरेच चढ-उतार पहायला मिळू शकतात. नोकरीमध्ये संतुष्टी न मिळण्याचीही शक्यता आहे. याशिवाय सहकाऱ्यांपासून थोडे अंतर ठेवून वागा, कारण त्यांच्यामुळे तुम्हाला नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यापार क्षेत्राबद्दल बोलायचे झाल्यास, फायद्यात तोटा होऊ शकतो. 

हेही वाचा : Guru Margi: नवीन वर्षात गुरु ग्रह होणार मार्गस्थ; 'या' राशींना मिळेल पैसाच पैसा

कुंभ रास 
या राशीत शुक्र आठव्या घरात राहील. त्यामुळे या राशीच्या जातकांच्या प्रगतीमध्ये अडथळे उत्पन्न होऊ शकतात. वैवाहिक जीवनात बाधा येण्याची शक्यता आहे. यामुळे नाते आणि प्रतिष्ठेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. नोकरदार व्यक्तींना कामाच्या ठिकाणी काही कारणास्तव तणावाला सामोरे जावे लागेल. तुम्ही तुमच्या नोकरीबद्दल आनंदी नसाल. नवीन नोकरीच्या शोधात तुम्ही राहू शकता. व्यापार क्षेत्रातील व्यक्तिंना मेहनतीचे समाधानकारक फळ मिळणार नाही. तुमचे प्रतिस्पर्धी तुमच्यावर वर्चस्व गाजवू शकतात.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )