कंगना रानौतच्या 'मणिकर्णिका'ची १०० कोटींच्या क्लबकडे वाटचाल

पाहा, किती झालीय कंगना रानौतच्या 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या सिनेमाची १० दिवसांची कमाई

Updated: Feb 4, 2019, 01:55 PM IST
कंगना रानौतच्या 'मणिकर्णिका'ची १०० कोटींच्या क्लबकडे वाटचाल title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत हिच्या 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळालंय. प्रजासत्ताक दिनी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाद्वारे कंगना सध्या चर्चेत आहे. नेहमीप्रमाणेच या सिनेमातील सर्वोत्तम अभिनयासाठी कंगनाची चर्चा सुरू आहे... आणि अर्थातच कंगनाच्या या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर एकच धुमाकूळ घातलाय. आता या सिनेमानं १० दिवसांत केलेल्या कमाईचा आकडाही समोर आलाय. त्यावरून तुम्हाला या यशाचा अंदाज लावता येऊ शकेल.


मणिकर्णिकाची कमाई

सिनेसमीक्षक तरण आदर्श यांच्या म्हणण्यानुसार, १० दिवसांनंतर बॉक्स ऑफिसवर या सिनेमान ७६.६५ करोड रुपयांची कमाई केलीय. कंगनाच्या 'मणिकर्णिका'नं पहिल्या पाच दिवसांत ५० कोटी रुपयांचा आकडा पार केला होता. आता या सिनेमाची १०० करोडच्या क्लबमध्ये सहभागी होण्याकडे वाटचाल सुरू झालीय. 

मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' हा सिनेमा २५ जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. या सिनेमात कंगनासोबत अंकिता लोखंडे, अतुल कुलकर्णी, जीशू सुरेश ओबेरॉय हे कलाकारही आहेत.

राधा कृष्ण जगरालमुडी आणि कंगना रानौतने दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात १८५७ चा रणसंग्राम आणि झाशीच्या राणीच्या पराक्रमावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. हा सिनेमा हिंदी, तामिळ आणि तेलुगू या तीन भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. मुख्य म्हणजे क्वीन कंगनाच्या या चित्रपटाला देशभरात बऱ्याच स्क्रीनमध्ये जास्तीत जास्त शो मिळाले आहेत.