अमेरिकेत ३० कोटींचा बंगला, मुंबईत ३ कोटींचे घर; करोडोंची मालकिण आहे ही अभिनेत्री

 अनेक स्टार कलाकारांकडे करोडो रुपयांची संपत्ती आहे.  

Updated: Aug 21, 2019, 04:27 PM IST
अमेरिकेत ३० कोटींचा बंगला, मुंबईत ३ कोटींचे घर; करोडोंची मालकिण आहे ही अभिनेत्री title=

मुंबई : आपल्याला माहीत आहे की, सिनेमा जगतात एका पेक्षा अनेक स्टार कलाकारांकडे करोडो रुपयांची संपत्ती आहे. मात्र, आज आम्ही तुम्हाला अशा एका अभिनेत्रीबाबत सांगत आहोत, अमेरिकेत ३० कोटींचा बंगला आहे. चला मग तिच्याबद्दल आपण जाणून घेऊ.

आम्ही ज्या अभिनेत्रीची चर्चा करत आहे तिचे नाव आहे, सनी लिओनी. तिने कमी वेळात मोठी प्रसिद्धी मिळवली. ती भारतात आली आणि तिने बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली. मात्र कमी वेळात तिने आपले नाव केले. २०१२ मध्ये रिलीज झालेल्या 'जिस्म २' या सिनेमातून तिने पदार्पण केले. तिचा हा पहिला सिनेमा. या सिनेमानंतर ती बॉलिवूडमध्ये फेमस झाली.


 
तिने आपल्या करिअरमध्ये चांगले काम केले. तिने आतापर्यंत जवळपास १७ सिनेमात काम केले आहे. तिच्या करिअरमध्ये दोन सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट झालेत. 

सूत्रांच्या माहितीनुसार सिनेमात काम करणारी सनी लियोनी आता करोडो संपत्तीची मालकिन झाली आहे. 'टाइम्स नाऊ न्यूज' च्या वृत्तानुसार तिच्याकडे ९७ कोटी रुपयांची संपत्ती आहे. तिचे वर्षाचे उत्पन्न २ कोटींच्या घरात आहे.

याशिवाय तिच्याकडे १.१४ कोटी किंमतीच्या मासेराती गिबली सारख्या अनेक महागड्या गाड्यांचा संग्रह आहे, त्याशिवाय मुंबईतील त्यांचा बंगला जवळपास ३ कोटींचा आहे, तर अमेरिकेत स्थित त्यांचा पाच बेडरूमचा बंगला जवळपास ३० कोटींचा आहे.