मुंबई : चित्रपट जगतातून एक वाईट बातमी समोर येत आहे. साऊथ अभिनेत्री रंजूषा मेनन हिने राहत्या घरी आत्महत्या केली आहे. तिचा मृतदेह तिच्याच राहत्या घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मात्र आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पण या बातमीने इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे, अभिनेत्रीच्या जवळच्या लोकांना या बातमीने प्रचंड धक्का बसला आहे.
३५ वर्षीय अभिनेत्रीने केली आत्महत्या
रंजूषा मेनन ही ३५ वर्षांची होती. 30 ऑक्टोबरला सकाळी या अभिनेत्रीचा मृत्यू झाला असला तरी आता तपशील समोर आला आहे. रंजूषाचा मृतदेह तिरुअनंतपुरमच्या श्रीकरियत येथील घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. अभिनेत्री काही काळ श्रीकरियतमध्ये पती आणि मुलांसह भाड्याने राहत होती. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी तिरुवनंतपुरम मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आला आहे. पोलिस सध्या या संपुर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
मृत्यूच्या पहिल्या दिवशी मजेदार रील
रंजूषा इंस्टाग्रामवरही खूप सक्रिय असते. मृत्यूपूर्वी रंजूषाने इन्स्टाग्रामवर एक मजेदार रील पोस्ट केली होती. ती अनेकदा तिच्या सहकलाकारांसोबत व्हिडिओ बनवायची. रंजूषाने 29 ऑक्टोबरला एक रीलही शेअर केलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळपर्यंत काय घडलं, ज्यामुळे अभिनेत्रीने हे पाऊल उचललं आणि गळफास लावत आत्महत्या केली. हे प्रकरण अजूनही गूढच आहे. रंजूषा हे इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे.
सिटी ऑफ गॉड, मेरीकुंदरू कुंजाड यांसारख्या अनेक चित्रपट आणि अनेक टेलिव्हिजन शोमध्ये तिने काम केलं आहे. ती शेवटची आनंदरागममध्ये दिसला होती, जिथे तिने मुख्य भूमिका साकारली होती. सिटकॉम वरण डॉक्टरनूमध्ये तिने विनोदी भूमिका साकारली होती. त्याच बरोबर तिने एन्टे माथावू आणि मिसेस हिटलर सारख्या चित्रपटांमध्ये आपल्या चमकदार अभिनयाने लोकांचं मनोरंजन केलं आहे.
अभिनेत्रीच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे. चाहते सोशल मीडियावर सतत कमेंट करत आहेत आणि अभिनेत्रीला 'रेस्ट इन पीस' लिहित आहेत. गेल्या महिन्यात आणखी एक मल्याळम अभिनेत्री अपर्णा नायर हिने आत्महत्या केली होती. ती अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये दिसली आहे. अपर्णाचा मृतदेहही फ्लॅटमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.