Maharashtra Assembly Elections 2024 : सोयाबीनचे पडलेले भाव यंदा सत्ताधाऱ्यांना अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे .उत्तर महाराष्ट्रात कांद्याने रडवलं तर विदर्भ आणि मराठवाड्यात सोयाबीन सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडू शकतो. विधानसभा निवडणुकीतही बसू शकतो.. खास करून मराठवाडा आणि विदर्भात याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला कांद्यानं रडवलं होतं....कांद्याचे भाव कोसळल्यानं संतापलेल्या शेतकऱ्यांनी सहा लोकसभा मतदारसंघात विरोधात कौल दिला होता. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सोयाबिनचे भाव कोसळलेत. तीन वर्षांपूर्वी सहा हजारांच्या घरात विकला जाणारा सोयाबिन आता तीन हजार रुपये क्विंटलनं विकला जातोय.
राज्यात मराठवाडा,विदर्भात सोयाबिन 30 लाख हेक्टरवर पिकवलं जातं. सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांच्या संतापाचा सामना जवळपास 60 ते 70 मतदारसंघात करावा लागण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात लातूर, धाराशिव, जालना, बीड, परभणी, संभाजीनगरमधील जवळपास सर्वच मतदार संघात फटका बसू शकतो.
विदर्भात यवतमाळ, गडचिरोली , चंद्रपूर, वर्धा , वाशिम , अकोला , बुलढाणा या जिल्ह्यातील मतदारसंघात सत्ताधा-यांना फटका बसू शकतो सोयाबीनला भाव नसल्यानं शेतकरी हवालदिल आहे. निवडणुकांच्या काळात सत्ताधाऱ्यांना ही नाराजी परवडणारी नाही. सोयाबीनच्या दरावरून विरोधक सुद्धा आक्रमक झालेत
सोयाबीनच्या दरावरून शेतकऱ्यांमध्ये नाराजी असतानाही सत्ताधारी मात्र,आम्हाला फटका बसणार नाही असं म्हणतायेत. सत्ता येताच मुख्यमंत्री सगळं व्यवस्थित करतील असं विश्वास संजय शिरसाठ यांनी व्यक्त केलाय. कांद्याबाबत सरकारनं जशी दक्षता घेतली तशी सोयाबिनच्या भावाबाबत सरकारनं कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत का असा सवाल उपस्थित होतोय. जर सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांनी आपला संताप मतपेटीतून व्यक्त केला तर महायुतीचं अवघड होऊन बसणार आहे.
RWA
(19.4 ov) 102
|
VS |
BRN
105/2(17.2 ov)
|
Bahrain beat Rwanda by 8 wickets | ||
Full Scorecard → |
BRN
(19 ov) 89
|
VS |
TAN
90/0(10.1 ov)
|
Tanzania beat Bahrain by 10 wickets | ||
Full Scorecard → |
GER
(20 ov) 219/7
|
VS |
MAW
182/7(20 ov)
|
Germany beat Malawi by 37 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.