close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

वेब सीरिजच्या सेटवर उच्छाद मांडणाऱ्यांपैकी सात जणांना अटक

जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं? 

Updated: Jun 20, 2019, 01:40 PM IST
वेब सीरिजच्या सेटवर उच्छाद मांडणाऱ्यांपैकी सात जणांना अटक

मुंबई : बुधवारी अभिनेत्री माही गिल आणि इतर कलाकार घोडबंदर रोड येथील एका फॅक्ट्रीमध्ये चित्रीकरण करत होते.या प्रकरणी अखेर कारवाई करत सात जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. वेब सीरिजचं चित्रीकरण सुरु असतेवेळीच त्या ठिकाणी काही ठिकाणी गुंड आले आणि त्यांनी सेटवर उपस्थित कलाकारांना शिवीगाळ करण्यास, त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली होती. 

अतिशय गंभीर अशा या प्रकरणी अभिनेत्री माही गिल हिनेही तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला होता. इतकच नव्हे तर, तिने आपल्याला आणि इतर महिला कलाकारांनाही मारहाण केल्याची माहिती उघड केली. 

तिग्मांशू धुलियाने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हि़डिओ पोस्ट करत संपूर्ण प्रसंगाची माहिती दिली. या संपूर्ण प्रकरणात आपल्याला पोलिसांचं सहकार्य न मिळाल्याचंही त्याने सांगितलं. काही कलाकारांनीही हा व्हि़डिओ शेअर करत सदर प्रकरणीचा निषेध केला. 

वाचा : पोलीसच गुंड आहेत, बॉलिवूड अभिनेत्रीची संतप्त प्रतिक्रिया 

सध्याच्या घडीला हा संपूर्ण प्रकार पाहता एएनआय या वृत्तसंस्थेनुसार सात गुंडांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय कलाकारांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्याला अनुसरुन अभिनेत्री माही गिल हिच्यासह वेब सीरिजची संपूर्म टीम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे कलाकारांना तोंड द्यावा लागलेला हा प्रसंग पाहता त्यावर काही कठोर पावलं उचलली जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.