Friendship Day : KK ला मुलांकडून खास भेट, व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही व्हाल भावुक

'यारो दोस्ती बडी ही...', मैत्रीचं महत्त्व आपल्या गाण्यातून पटवून देणाऱ्या KK च्या आठवणी पुन्हा ताज्या, Friendship Day च्या दिवशा केकेला मुलांकडून खास भेट  

Updated: Aug 7, 2022, 09:15 AM IST
Friendship Day : KK ला मुलांकडून खास भेट, व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही व्हाल भावुक  title=

मुंबई : 'यारो दोस्ती बडी ही...', खरंच आयुष्यात मैत्री नाही, तर काहीच नाही. याच मैत्रीच आयुष्यात असणार महत्त्व सांगणारा गायक म्हणजे केके. केके आज आपल्यात नसला, तरी त्याची गाणी कायम आपल्याला प्रेरणा देतील. केकेचं प्रसिद्ध झालेल्या गाण्यांपैकी एक म्हणजे 'यारो दोस्ती बडी ही...' आज फ्रेंडशीप डे... आजच्या दिवशी अनेक जण सोशल मीडियावर आपल्या मित्रांना टॅग करत हे गाणं स्टेटसला ठेवतील. पण केकेच्या मुलांनी गायकाला आजच्या दिवशी मोठी भेट दिली आहे. 
 
केकेच्या मुलांनी फ्रेंडशिप डेला वडिलांना आदरांजली वाहिली आहे. मैत्री दिनाला केकेचं हे लोकप्रिय गाणं सगळीकडेच लावलं जातं हे लक्षात घेऊन या मुलांनी काही गायकांसोबत पुन्हा एकदा हे गाणं नव्यानं समोर आणलंय. शान, पॅपॉन, बेनी दयाल, ध्वनि भानुशाली आणि लेस्ली लुईस यांचे सूर या गाण्यात आहेत.

केकेची मुलगी तामारानं हे गाणं इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. 'यारो... नेहमी माझ्यासाठी खास होतं. मी आणि नकुलने पहिल्यांदा हे गाणं एकत्र गायलं आहे. पप्पापण आमच्यासोबत आज हे गाणं गायिले असते तर!' असं म्हणत तामारानं वडिलांचं आयुष्यात असणारं महत्त्व सांगितलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तामारा पुढे म्हणाली, 'पप्पांनी पर्पल हेज स्टुडिओत गाणं रेकॉर्ड केलं होतं, तिथेच आम्ही ते रेकॉर्ड केलं. 24 वर्षांपूर्वी हे गाणं रेकॉर्ड झालं होतं. असं म्हणत तामारा 'लव्ह यू पप्पा.' असं म्हणाली. 

संगिताला आपलं आयुष्या माननाऱ्या केकेचं एका कार्यक्रमादरम्यान निधन झालं. 31 मे रोजी केके यांनी जगाचा निरोप घेतला. केकेच्या निधनाने कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली. पण केके कायम त्याच्या कलेतून चाहत्यांमध्ये जिवंत आहे.