Aadesh Bandekar Birthday: महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या जन्मदिवशी त्यांच्या मुलानं सोहम बांदेकरनं इन्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्या दोघांचाही एक जूना फोटो आहे. हा फोटो सोहमच्या लहानपणीचा असून या फोटोच्या खाली कॅप्शनमध्ये सोहमनं (Soham Bandekar) त्याच्या वडिलांना शुभेच्छा दिल्या असून एक खास संदेशही दिला आहे. 'झी मराठी' वाहिनीवरील 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमानं सगळीकडेच लोकप्रियता मिळवली आहे. त्यातून आजही या कार्यक्रमाचे सर्व भाग प्रेक्षक आवर्जून पाहतात. त्यामुळे या कार्यक्रमाची लोकप्रियता कमी झालेली नाही. 'होम मिनिस्टर' (Home Minister) या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करणारे महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर (Soham Bandekar Instagram Post) आपला बर्थडे सेलिब्रेट करत आहेत. (Aadesh Bandekar Birthday Adesh Bandekar Son Post emotional Photos to his father)
इन्टाग्रामवरून सोहमनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, हॅप्पी बर्थडे बाबा, तूला कधी कधी वाटतं असेल की, मी लहान होतो तेव्हा बरा होतो. म्हणून लहानपणीचा फोटो टाकला आहे. यासोबत आपल्या वडिलांचा एक लेटेस्ट फोटोही शेअर केला आहे. या फोटोंखाली चाहत्यांनीही खूप चांगल्या कमेंट्स केल्या आहेत आणि त्याचसोबत आदेश बांदेकर यांना शुभेच्छाही (Birthday Wishes) दिल्या आहेत. या फोटोला त्यांच्या चाहत्यांनी लाईक्सही केले आहेत.
या फोटोत आदेश बांदेकर यांना ओळखणंही कठीण झाले आहे. हा त्यांच्या तरूणपणीचा फोटो आहे. या फोटोखाली आदेश बांदेकरांचा जूना फोटो पाहूनही त्यांचे चाहते पॉझिटिव्ह कमेंट्स करत आहेत. आदेश बांदेकरांचा मुलगाही कलाक्षेत्रात सक्रिय आहे. आदेश बांदेकर यांच्या पत्नी सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar) याही अभिनेत्री आहेत. त्यांचा नुकताच 'झिम्मा' (Zimma) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता त्यांच्या या चित्रपटाला चांगला प्रतिसादही मिळाला आहे.
गेली वीस वर्षे सुरू असलेल्या होम मिनिस्टर या कार्यक्रमामुळे आंदेश बांदेकर यांचे नावं हे घराघरात प्रसिद्ध आहे. कलाविश्वासोबत ते राजकीय पटलावरही सक्रिय आहेत. मराठी चित्रपट, मालिकांमधूनही त्यांनी काम केलं आहे. सध्या आदेश बांदेकर आपल्या होम मिनिस्टर या कार्यक्रमात व्यस्त आहेत. आदेश बांदेकर यांच्या मुलगाही कलाक्षेत्रात सक्रिय आहे. त्यानं 'लक्ष्य 2' (Soham Bandekar Serial) या मालिकेतून काम केले आहे. येत्या काळातही त्याचे काही प्रोजेक्ट्स येण्याच्या मार्गावर आहेत.
होम मिनिस्टर या कार्यक्रमातून आदेश बांदेकर यांनी आत्तापर्यंत हजारो कुटुंबियांच्या घरी जाऊन महाराष्ट्रातील वहिनींना पैठणी (Paithani) मिळवून दिली आहे. नुकताच त्यांचा महामिनिस्टर (Mahaminister) हा कार्यक्रम पार पडला ज्यात त्यांनी महाराष्ट्राच्या गृहलक्ष्मीचे स्वप्न पुर्ण केले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातल्या प्रत्येकांची मनं जिंकली आहेत.