आई कुठे काय करते : अंकिता करणार का गौरीला टार्गेट?

गावच्या घरी शेखर आल्याने मालिकेला मिळणार का वेगळं वळणं?

Updated: Jun 9, 2021, 02:02 PM IST
आई कुठे काय करते : अंकिता करणार का गौरीला टार्गेट?

मुंबई : स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते?' मालिकेला वेगळं वळण पाहायला मिळत आहे. अनिरू्दध आणि अरूंधती यांचा सेप्रेशनचा काळ संपला आहे. आता कधीची घटस्फोटावर सही करून ते वेगळे होतील. ही गोष्ट घरातल्यांना कळताच सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. अशा परिस्थितीत आई संजनाला मुंबईत पाठवण्यासाठी शेखरला बोलून घेते. 

शेखर आल्यामुळे अनिरू्दध संजना आणि आई या दोघांवरही भरपूर भडकतो. शेखरच्या येण्याने सगळ्यांनाच धक्का बसतो. मात्र संजनाचा अरूंधतीला त्रास होत आहे. आणि यामुळेच तिची तब्बेत बिघडली हे ऐकून शेखर तेथे येतो. 

मात्र, या सगळ्यात अंकिताचं मात्र वेगळंच सुरू आहे. आपण डॉक्टर आहोत, असं म्हणतं अंकिता अभिषेकच्या मागे तगादा लावते. पण घरच्यांना सोडून कुठेही येणार नाही या मतावर अभिषेक ठाम राहतो. पुन्हा एकदा तो अंकिताच्या आत्महत्या प्रकरणावर शंका व्यक्त करतो. 'घरच्यांना वाटतं तसंच खरं असेल तर तू मला काहीही न सांगता घर सोडून जा.', असा थेट इशाराच अभिषेकने अंकिताला दिलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

एकाबाजूला अंकिता अभिषेकला कुटुंबियांपासून दूर करण्याचा प्रयत्न करते. तर दुसरीकडे गौरीला टार्गेट करते. संजना आणि गौरी उद्या एकत्र येऊन या घराची वाट लावतील. अशा पद्धतीचं वक्तव्य ती करते. यामुळे गौरीला रडू कोसळतं. पण त्याचवेळी अरूंधती येऊन 'गौरी कुणाच्याही बोलण्याने डोळ्यातून पाणी काढायचं नाही,' असं खडसावून सांगते. 

पुढच्या भागात अंकिताचं सत्य सगळ्यांसमोर येणार का? शेखर संजनाला घेऊन मुंबईत जाणार का? तर अरूंधती आपला निर्णय बदलणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.