Aai Kuthe Kai Karte : यशसोबत नाही तर आरोही 'या' व्यक्तीसोबत झाली Enagaged

Aai Kuthe Kai Karte : 'आई कुठे काय करते' ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या मालिकेने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. आरोहीचा साखरपुडा यशसोबत नाही तर या व्यक्तीसोबत झाला आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jan 1, 2024, 03:16 PM IST
Aai Kuthe Kai Karte : यशसोबत नाही तर आरोही 'या' व्यक्तीसोबत झाली Enagaged title=

स्टार प्रवाहवरील मालिका 'आई कुठे काय करते' हीने प्रेक्षकांच मन जिंकल आहे. असं असताना या मालिकेतील प्रत्येक पात्राने चाहत्यांच लक्ष वेधल आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी 'आरोही' हे नव पात्र मालिकेत आलं आहे. यश-आरोहीच्या साखरपुड्याची चर्चा सुरु असतानाच आरोही म्हणजे लाडकी अभिनेत्री कौमुदी वालोकरने गोड बातमी शेअर केली आहे. 

अभिनेत्री कौमुदी वालोकर 2023 च्या अखेरीस बंधनाच अडकली आहे. या वर्षाच्या अखेरीस आम्ही जीवनाचं नवा भाग सुरु केला आहे, असं म्हणतं कौमुदीने आपल्या जोडीदारासोबतचा फोटो शेअर केला आहे. आकाश चौकसे असा आरोहीच्या खऱ्या यशचे नाव आहे. 

कोण आहे आरोहीचा खरा यश?

आकाश चौकसेने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आरोहीचा खरा यश असं हँडलचं नाव दिलं आहे. आकाश हा मनोरंजन क्षेत्रातील नसून तो उच्च शिक्षित आहे. आकाशने देखील आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर कौमुदीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. कौमुदीने आपल्या जोडीदारासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. 

आरोहीचा खरा जोडीदार

मालिकेतही खास ट्विस्ट 

आरोही हे पात्र कौमुदी आई कुठे काय करते मध्ये साकारत आहे. आता यश आणि आरोहीच्या नात्यामध्ये थोडं अंतर आलं आहे. यशसाठी आरोही आजीची परिक्षा द्यायला तयार होते. पण असं असतानाच यशला गौरीचा फोन येतो आणि यांच्या नात्यात दुरावा निर्माण होतो. यश त्याच्या आयुष्यात काय निर्णय घेतो. याकडे सगळ्यांच लक्ष लागून राहिलं आहे. असं असताना आरोहीने खऱ्या आयुष्यात मात्र आपला जोडीदार निवडला आहे.