'माझ्यासाठी माझ्या दोन्ही पत्नी....', विभक्त झाल्यानंतरही आमिरच मोठं वक्तव्य

घटस्फोटानंतर दुसऱ्या पत्नीबद्दलच नाही, तर पहिल्या कुटुंबासाठी आमिरच्या मनात अशी भावना, सर्वत्र खळबळ   

Updated: Aug 3, 2022, 08:14 AM IST
'माझ्यासाठी माझ्या दोन्ही पत्नी....', विभक्त झाल्यानंतरही आमिरच मोठं वक्तव्य title=

मुंबई  : कलाविश्वात अनेक घडामोडी अशा घडत असतात, ज्यावर सामान्य जनतेचा काही वेळा विश्वासच बसत नाही.  झगमगत्या विश्वातील सर्वात मोठी आणि चर्चेत असणारी गोष्ट म्हणजे, त्यांच्या नात्यात असलेली गुंतागुंत. इंडस्ट्रीमध्ये असे अनेक जोडपे आहेत, जे त्यांच्या लग्नामुळे नाही तर घटस्फोटामुळे चर्चेत असतात. अनेक वर्षांच्या सुखी संसारानंतर त्यांची वाट कायमसाठी वेगळी होते, पण अभिनेता आमिर खानचे दोन घटस्फोट झाले असले, तरी अभिनेता दोन्ही कुटुंबांना वेळ देत असतो. 
 
सध्या परफेक्शनिस्ट आमिर आगामी 'लाल सिंग चड्ढा' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी अभिनेता दिग्दर्शक करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 7' शोमध्ये पोहोचला. यावेळी आमिरने करणसोबत प्रोफेशनल त्याचबरोबर खासगी आयुष्यावर देखील मनमोकळ्या गप्पा मारल्या. 

आमिरने काही महिन्यांपूर्वी दुसरी पत्नी किरण रावसोबत घटस्फोट घेतला. आमिर आणि किरणने विभक्त झाल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली. दोघांच्या या टोकाच्या निर्णयामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. 

दरम्यान, ''कॉफी विथ करण 7' शोमध्ये आमिरने त्यांच्या दोन्ही कुटुंबाबद्दल आणि पहिली पत्मी रीना दत्त, दुसरी पत्नी किरण रावबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनेता म्हणाला, 'माझ्या मनात दोघींसाठी सन्मान आणि आदर आहे...'

'मार्ग वेगळे झाले असले, तरी आम्ही आजही एक कुटुंब आहोत. व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत आम्ही आठवड्यातून एकदा भेटतो, एकमेकांची काळजी करतो...' सध्या आमिरचं हे वक्तव्य तुफान चर्चेत आहे. 

आमिरची पहिली पत्नी रीना दत्तला दोन मुलं आहेत. रीना आणि आमिरच्या मुलीचं नाव आयरा आहे, तर मुलाचं नाव झुनैद आहे. आमिरची दुसरी पत्नी किरण रावला एक मुलगा आहे. त्याचं नाव आझाद आहे.  अनेकदा आमिर मुलांसोबत वेळ व्यतीत करताना दिसतो. 
 
आमिरचे सिनेमे... 
आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' 11 ऑगस्टला रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. हा हॉलिवूड सिनेमा फॉरेस्ट गंपचा हिंदी रिमेक आहे. सिनेमाद्वारे आमिर बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर परतत आहे. 

दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य 'लाल सिंग चड्ढा' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. 'लाल सिंग चड्ढा' प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमाची टक्कर अभिनेता अक्षय कुमार स्टारर 'रक्षाबंधना'सोबत असणार आहे.