अभिनेता आमिर खानची अवस्था पाहून चाहत्यांना बसला मोठा धक्का; Photo Viral

आमिर खानने अभिनयातून ब्रेक घेतला आहे. रुपेरी पडद्यावर दिसण्यापासून ब्रेक घेतल्यानंतर, अभिनेता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. मात्र आता नुकताच अभिनेता अशा अवस्थेत दिसला की...

Updated: Feb 13, 2023, 02:43 PM IST
अभिनेता आमिर खानची अवस्था पाहून चाहत्यांना बसला मोठा धक्का;  Photo Viral title=

मुंबई : बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून आमिरला ओळखलं जात. मात्र हाच आमिर खान आपल्या वैयक्तीक आयुष्यासाठी, कायमच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला बघायला मिळतो. गेल्यावर्षी घटस्फोट घेवून त्याने सर्वांनाचा मोठा धक्क दिला. मात्र सध्या तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. 

आमिर खानने अभिनयातून ब्रेक घेतला आहे. रुपेरी पडद्यावर दिसण्यापासून ब्रेक घेतल्यानंतर, अभिनेता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. अलीकडेच तो एका लग्न समारंभात दिसला, जिथे इंडस्ट्रीतील सर्व स्टार्स उपस्थित होते. या लग्नाचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. मात्र, आमिर खानच्या एका फोटोने लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  

वॉल्ट डिस्ने कंपनी इंडिया आणि स्टार इंडियाचे अध्यक्ष के. माधवन यांचं हे लग्न होतं. जयपूरच्या रामबाग पॅलेसमध्ये हा विवाहसोहळा पार पडला, ज्यात अक्षय कुमार, मोहनलाल, पृथ्वीराज सुकुमारन यांच्यासह चित्रपट सृष्टीतील अनेक ए-लिस्ट कलाकारांनी हजेरी लावली होती. स्टार्सने उपस्थित असलेल्या या लग्नात अभिनेता आमिर खानचा एक फोटो मोठ्या प्रमाणाच व्हायरल होत आहे.

लग्नाशी संबंधित सर्व फोटोमध्ये एक असा फोटो आहे, ज्यामध्ये आमिर खान काठी घेऊन उभा आहे. या लग्नात आमिर दक्षिणेतील पारंपारिक एथनिक पोशाखात दिसत आहे. त्याने पांढऱ्या रंगाचे धोतर आणि क्रीम रंगाचा कुर्ता घातला आहे.

या लग्नात अक्षय कुमारसोबत साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार मोहनलाल यांनीही हजेरी लावली होती. लग्नात त्यांनी भांगडा नृत्य सादर केलं, ज्याचा व्हिडिओ अक्षय कुमारने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडओ सोशल मीडियावर येताच चाहत्यांनी त्यावर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करायला सुरुवात केली.

आमिर खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर त्याने 'हम हैं राही प्यार के', 'दिल', 'सरफरोश', 'लगान', 'दिल चाहता है', 'रंग दे बसंती', थ्री इडियट्स, तलाश आदी अनेक गाजलेले चित्रपट बालिवूडला दिले.  

बॉलिवूड अभिनेता आमिर खानने काही काळासाठी अभिनयातून ब्रेक घेतला आहे. लाल सिंह चड्ढा फ्लॉप झाल्यानंतर, अभिनेता दीर्घकाळानंतर लग्नसोहळ्यात दिसला. यावेळी आमिर खानचा एकदम वेगळा लूक पाहायला मिळाला. तर काहि दिवसांपूर्वी एका कार्यक्रमादरम्यान आमिर खानने त्याच्या भविष्यातील प्लॅनबद्दल सांगितलं आणि यादरम्यान अभिनेत्याने सांगितलं की तो काही काळ अभिनयातून ब्रेक घेत आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x