मुंबई : बाबा निराला यांच्या काळ्या कारनाम्यावर आधारित 'आश्रम' या वेबसिरीजचे तीनही सीझन हिट ठरले. त्यानंतर चाहते 'आश्रम 4' ची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'आश्रम सीझन 4' च्या टीमने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये अदिती पोहिनकर आणि बॉबी देओल इतर स्टारकास्टसोबत दिसत आहेत.
पम्मी पहेलवान बाबा निराला आणि भोपासोबत दिसली
या फोटोंमध्ये पम्मी पहलवान भोपा आणि बाबा निराला यांच्यासोबत पोज देताना दिसली. यासोबतच इइंस्पेक्टर उजागर फोटोंमध्ये दिसले. समोर आलेल्या या फोटोच हे स्टार्स खूप आनंदी दिसत होते आणि एकमेकांसोबत क्वालिटी टाइम घालवताना दिसत आहेत.
आदितीने फोटो शेअर केले आहेत
पम्मी पहेलवानची भूमिका साकारणाऱ्या आदिती पोहनकरने हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं की, ' किती सुंदर आहे ही संध्याकाळ. प्रेमाने परिपूर्ण आणि मित्रांसोबत सजलेली. पम्मी पहेलवानचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. हे पाहिल्यानंतर 'आश्रम सीझन 4' पाहण्यासाठी चाहते आणखीनच उत्सुक झाले आहेत.
यूजर्स अशा कमेंट करत आहेत
पम्मीने हे फोटो शेअर करताच चाहत्यांनी सतत कमेंट करायला सुरुवात केली. एका यूजरने लिहीलं की, 'जपनाम पम्मी तर अजून एकाने लिहीलंय, 'जय हो गरीबों वाले बाबा की.' तर अजून एकाने लिहीलंय, 'मिल तो गई आपको ..अब चौथा पार्ट जल्द ही.' अशा अनेक प्रकारच्या कमेंट चाहते अभिनेत्रीच्या या पोस्टवर करत आहेत.
कधी येणार आश्रम 4?
'आश्रम सीझन 3' संपल्यानंतर शेवटच्या एपिसोडमध्ये 'आश्रम 4' सीझनची झलक दाखवण्यात आली. या झलकमध्ये पम्मी नववधूच्या वेशात दिसली, ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली. 'आश्रम सीझन 4' ची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही पण लवकरच याची रिलीज डेट जाहीर होईल अशी अपेक्षा आहे.
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.