मुंबई : अभिजीत साटम गेली वीस वर्ष मनोरंजन विश्वात वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या भूमिकेतून कार्यरत आहे. असामान्य विचार,त्याच कृतीत रुपांतर आणि इंटर प्राइजिंग कामाला प्राधान्य देणारा असा हा अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता.
निर्माता म्हणून रंगभूमीवर नऊ दहा नाटकांची निर्मिती त्यांने केली. त्यातील मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी, संगीत लग्नकल्लोळ, मिस्टर अँड मिसेस, एक शून्य तीन, एपिक गडबड ही पुरस्कारांनी तारांकित अशी नाटकं त्याचबरोबर हापूस सारख्या यशस्वी चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन देखील त्याने केलं.
अनेक जाहिराती आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते लघुपट केल्यानंतर, काळाची गरज समजून मराठी कार्यक्रम व नाटकांसाठी सुरू केलेली ऑनलाइन तिकीट योजना असलेलं ticketees.com हि त्याची संकल्पना व निर्मिती ज्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. डिमाॅनेटायजेशन च्या काळात त्याच्या टेकनॉलॉजि च्या ह्याच ताकदीमुळे मराठी नाटकांना,निर्मात्यांना ऑनलाईन पेमेंटच्या वाटेवर मोलाची साथ मिळाली.
दरवेळी परिस्थिती, सभोवतालचे बदल लक्षात घेऊन पुढचं पाऊल उचलण्याच्या त्याच्या या वृत्तीने लॉकडाउनच्या काळात सुद्धा त्याने शांत न बसता या काळाचा सदुपयोग करून या मराठी तरुणाने पुन्हा एकदा आपल्याला आनंदाचा धक्का दिला आहे.
teempool.com हि एक वेगळी संकल्पना असलेली वेबसाईट तो आता आपल्यासाठी घेऊन आला आहे. संकल्पना व निर्मितीचे यश त्याचं आणि त्याच्या या टीमचं आहे. ह्या वेबसाईटच्या माध्यमातून या कठीण काळात बाहेर जाणं थांबलं पण मॉलमध्ये न जाता घरी बसल्या सुद्धा तो माॅलसारखा सोशल शॉपिंगचा अनुभव आपण घेऊ शकतो.
मित्रमंडळी, सारखी आवड असणाऱ्यांना एकत्र करून एकत्र टीम शॉपिंग आणि स्वत:चे फ्लॅश सेल सुरू करू शकतो. एखाद्या गोष्टीसाठी एकत्र येण्याचा आनंद व एकत्र गोष्टींची खरेदी करून एकत्र सवलती मिळवल्याचा आनंद तुम्हाला यात मिळू शकेल.
अनेक छोटे उद्योग धंदे बंद पडण्याच्या भीती पूर्ण वातावरणात असताना, ही वेब साईट हा आशेचा किरण आहे. कुठल्याही गुंतवणुकीशिवाय या टीम च्या माध्यमातून तुमचा छोटा उद्योग तुम्ही इथे सुरू करू शकता आणि ह्यासाठी teempool.com हा प्लॅटफॉर्म कायम तुमच्या पाठीशी उभा असेल.
तुमची टीम तयार केली की आपोआप तुमचं ऑनलाईन शॉप तयार होतं त्या टीम च्या मार्केटप्लेस वर झालेल्या खरेदीचा तुम्हाला भाग करून घेणे हे ह्यांचं खरं वैशिष्टय.
घरातून चालणारे उद्योग कॉलेजमधील नव्या विचारांची मुलं यांना आपलासा वाटणारा हा आधारक्षम असा प्रयत्न. आजचा महत्वाचा भाग म्हणजे सोशल मिडीया. चॅट करणं फोटोस, व्हिडिओस शेअर करणं ही सुविधा सुद्धा इथे उपलब्ध असणार आहे. लाॅकडाऊन च्या आधी ह्याची चाचणी करताना भरभरून प्रतिसाद मिळाला होता आणि आता नवीन काळातला हा नवीन दृष्टिकोन प्रत्यक्ष उभा राहतोय 2 नोव्हेंबर पासून.
ह्या मराठी मुलाच्या या नवीन वाटचालीला भरघोस प्रतिसाद मिळेल ही आशा या निमित्ताने पुन्हा एकदा एक सुर्वणपीस अभिजीतच्या भाळी लागलं आणि आपल्याबरोबर इतरांना सुद्धा या प्लॅटफॉर्म चा फायदा होईल या काळामध्ये प्रत्येकालाच आपलं असं काहीतरी सुरु करता येईल यात शंका नाही.