मुंबई : बॉलिवूड आभिनेता अभिषेक बच्चन सध्या आगामी 'दसवी' सिनेमामुळे चर्चेत आहे. 7 एप्रिल रोजी अभिषेकचा 'दसवी' सिनेमा प्रदर्शीत होणार आहे. सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी अभिषेकने त्याचं वचन पूर्ण केलं आहे. सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी अभिषेक बच्चनने आग्रा तुरुंगातील कैद्यांना दिलेले वचन पूर्ण केले आहे.
आग्रा मध्यवर्ती कारागृहातील रक्षक आणि कैद्यांसाठी 'दासवी' सिनेमाचं पहिलं स्क्रिनिंग ठेवण्यात आलं. यावेळी सिनेमाचे कलाकार देखील उपस्थित होते.
सिनेमाचं शूटिंग आग्रा सेंट्रल जेलमध्येच झालं. शूटिंग पूर्ण झाल्यावर अभिषेकने तेथील लोकांना वचन दिले होतं की, तो तुरुंगातील लोकांना सिनेमा दाखवेल.
खुद्द अभिषेक बच्चनने इन्स्टाग्रम एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये, 'वचन म्हणजे वचन आहे...' असं लिहिलं आहे.
जेलमध्ये सिमेमाच्या स्क्रिनिंग दरम्यान अभिषेक बच्चनसोबत यामी गौतम आणि निम्रत कौर होत्या. सिनेमा 7 एप्रिल रोजी जिओ सिनेमा आणि नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.