सोशल मीडिया स्टारच्या प्रेमात पडला प्रसिद्ध अभिनेता; दिली प्रेमाची कबुली, कोण आहे ती?

सध्या मराठी मनोरंजन विश्वात लग्नाचा सीझन सुरु आहे. अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकत आहेत तर अनेकजण त्यांच्या प्रेमाची कबुली देताना दिसत आहेत. 

Updated: Nov 22, 2023, 07:34 PM IST
 सोशल मीडिया स्टारच्या प्रेमात पडला प्रसिद्ध अभिनेता; दिली प्रेमाची कबुली, कोण आहे ती?

मुंबई : सध्या मराठी मनोरंजन विश्वात लग्नाचा सीझन सुरु आहे. अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकत आहेत तर अनेकजण त्यांच्या प्रेमाची कबुली देताना दिसत आहेत. नुकतीच झी मराठीवरील मालिका सारं काही तिच्याचसाठीमधील अभिनेता अभी गावकरने त्याच्या प्रेमाची कबुली दिली आहे. काही दिवसांपुर्वी त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याच्या प्रेमाची कबुली दिली आहे. अभि गावकर सोशल मीडिया स्टार सोनालीला डेट करत आहे.

सध्या कोणाचा जमाना आहे असं म्हटल्यावर सगळ्यात आधी डोळ्यासमोर येतात ते म्हणजे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नेहमीच त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन त्यांच्या चाहत्यांचं मनोरंजन करत असतात. 

सोशल मीडियावर सोनाली गुरव ही खूप लोकप्रिय आहे. श्रुतीकची कुचकी गर्लफ्रेंड अशी तिची इन्स्टावर ओळख आहे. तरुणाशी कनेक्ट करणारे कंटेट घेऊन तिने गेल्या दोन तीन वर्षांत इन्स्टाग्रामवर अनेक रील्स आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. आज ती इन्स्टाग्रामची मराठमोळी राणी आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. याचबरोबर नुकतीच सोनालीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, तुझ्या सोबतचा प्रत्येक क्षण एखाद्या परीकथेचा खरा वाटतो. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अनेकजण या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. सोनालीने शेअर केलेल्या व्हिडीओवर चाहते लाईक्स कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. एका चाहत्याने लिहीलंय, या जोडीला झी मराठीची फेवरेट जोडी माझ्याकडून असं म्हटंलंय. तर अजून एकाने लिहीलंय, खूप सुंदर जोडी. तर अजून एकाने लिहीलंय, तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा. तर अनेकांनी सोनालीला ट्रोलही केलंय. 

काही दिवसांपुर्वी सोनालीचा मॉर्फ केलेला खोटा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला गेला होता. या घटनेबद्दल खुद्द सोनालीने सोशल मीडियावर सांगितलं होतं. तेवढंच नाही तर तिने या प्रकरणाबद्दल काळाचौकी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली होती. झी मराठी वाहिनीवर अनेक वेगवेगळे विषय घेऊन निर्माते प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. दोन सख्ख्या बहिणींच्या जीवनावर आधारित मालिका  'सारं काही तिच्यासाठी' अवघ्या काही वेळातच घराघरांत पोहचली. 
 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x