अजय देवगनच्या 'Raid 2' चित्रपटासंदर्भात मोठी अपडेट, या दिवशी होणार प्रदर्शित, पुन्हा एकदा दिसणार अमेय पटनायकाच्या भूमिकेत

अभिनेता अजय देवगनने गेल्या काही वर्षांत असे काही चित्रपट केले आहेत ज्यात तो कधी वडिलांच्या तर कधी प्रशिक्षकाच्या भूमिकेत, सल्ले देताना आणि आयुष्य सुधारताना दिसला आहे. आता पुन्हा एकदा अजय देवगणची दबंग स्टाईल लोकांना पाहायला मिळणार आहे.

सोनेश्वर पाटील | Updated: Sep 11, 2024, 05:43 PM IST
अजय देवगनच्या 'Raid 2' चित्रपटासंदर्भात मोठी अपडेट, या दिवशी होणार प्रदर्शित, पुन्हा एकदा दिसणार अमेय पटनायकाच्या भूमिकेत title=

Raid 2: बॉलिवूडच्या ॲक्शन हिरोंमध्ये अजय देवगनच्या नावाचा देखील समावेश होतो. कॉमेडी चित्रपटांमधून त्यांनी स्वत:साठी एक वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. मात्र, याआधीच त्याने ॲक्शन चित्रपटांद्वारे स्वत:चा वेगळा आधार निर्माण केला होता. 'शैतान' आणि 'मैदान'नंतर आता त्याच्या आगामी 'रेड 2' चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

राज कुमार गुप्ता दिग्दर्शित 'रेड' हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. आता या सिनेमाच्या सिक्वेलची घोषणा करण्यात आली आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी 'रेड 2' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आणि कलाकारांचा खुलासा केला आहे. यासोबतच चित्रपटाची कथानक आणि शूटिंग लोकेशन्सची माहिती देखील समोर आली आहे. 

'रेड 2' ची घोषणा

'रेड' हा अजय देवगनच्या टॉप क्लास चित्रपटांपैकी एक आहे. 'रेड' चित्रपटानंतर या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा करण्यात आली होती. आता या चित्रपटात अजय देवगन पुन्हा एकदा दिसणार आहे. तो पुन्हा एकदा आयआरएस अधिकारी अमेय पटनायकच्या भूमिकेत दिसणार असून, भ्रष्टाचाऱ्यांचा पर्दाफाश करून त्यांना धडा शिकवणार आहे.

रितेश देशमुख नकारात्मक भूमिकेत

राज कुमार गुप्ता 'रेड 2' या चित्रपटाचे दिग्दर्शनही करणार आहेत. या चित्रपटात अभिनेता रितेश देशमुख अशा व्यक्तीची भूमिका साकारणार आहे ज्याने अजयला त्रास दिला आणि ज्याच्या काळ्या धंद्याचा खुलासा संपूर्ण यंत्रणा हादरून गेला. 'रेड' प्रमाणेच 'रेड 2' हा देखील आयकर विभागाच्या छाप्यांवर आधारित चित्रपट असणार आहे. अजय आणि रितेश व्यतिरिक्त या चित्रपटात वाणी कपूर आणि रजत कपूर देखील असणार आहेत. 

या दिवशी होणार रिलीज

'रेड 2' हा चित्रपट 21 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या मुख्य कथानकाचे चित्रीकरण लखनौ आणि दिल्लीत होणार आहे. त्यामुळे आता चाहत्यांना देखील या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.