प्रिती झिंटासोबत जे घडलं, त्यासाठी का माफी मागतोय हा दिग्गज अभिनेता?

प्रिती झिंटासोबत ज्येष्ठ अभिनेत्याकडून जे घडलं ते .... 

Updated: Nov 23, 2021, 03:06 PM IST
प्रिती झिंटासोबत जे घडलं, त्यासाठी का माफी मागतोय हा दिग्गज अभिनेता? title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : काही दिवसांपूर्वीच प्रिती झिंटा आणि तिच्या पतीनं त्यांच्या जीवनात जुळ्या मुलांचं स्वागत केल्याची बातमी समोर आली. ज्यानंतर या जोडीवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये काही कलाकारांचाही समावेश होता. पण, एक चेहरा असा आहे जो सध्या प्रितीची जाहीर माफी मागताना दिसत आहे. 

प्रितीची माफी मागणारा हा चेहरा म्हणजे दिग्गज अभिनेते संजय खान यांचा. आपल्याकडून झालेली चूक पाहता, त्यासाठी प्रितीची माफी मागणं योग्यच आहे हीच भावना त्यांनी व्यक्त केली आहे. 

प्रिती सध्या बॉलिवूडमध्ये सक्रिय नाही. पण, आयपीएल संघामुळं ती कायमच चर्चेत असते. 

प्रितीची लोकप्रियताही कमी झालेली नाही. तिला अनेकजण अगदी सहजपणे ओळखतात. पण, संजय खान यांना मात्र हे काही जमलेलं नाही. 

विमान प्रवासादरम्यान, संजय यांची भेट प्रितीशी झाली. त्यावेळी मुलीनं त्यांची तिच्याशी ओळख करुन दिली. पण, ते प्रितीला ओळखू शकले नाहीत. 

आपल्याकडून झालेल्या या चुकीबद्दल त्यांनी ट्विट करत जाहीर दिलगिरी व्यक्त केली. 

तुझ्या नावासोबत झिंटा शब्द जोडला असता तर मी तुला ओळखलो असतो, कारण मी तुझे चित्रपट पाहिले आहेत. पण, आपण मात्र तिला ओळखू शकलो नाही याची खंत त्यांच्या मनात घर करुन राहिली. ज्यामुळं त्यांनी ट्विट करत प्रितीची माफी मागितली.