जॅकलीनचा हा फोटो सोशल मीडियावर होतोय ट्रोल

बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिझचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होतोय. बॉलीवूडची चांदनी गर्ल श्रीदेवी यांच्या अंत्यदर्शनासाठी जॅकलीन गेली होती. 

Updated: Mar 1, 2018, 12:30 PM IST
जॅकलीनचा हा फोटो सोशल मीडियावर होतोय ट्रोल title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिझचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होतोय. बॉलीवूडची चांदनी गर्ल श्रीदेवी यांच्या अंत्यदर्शनासाठी जॅकलीन गेली होती. 

यावेळी ती कारमधून उतरल्यावर तिने तेथील लोकांशी हसून अभिवादन केले. जॅकलीनचे हे हसू कॅमेऱ्यात कैद झाले. यानंतर लोकांनी सोशल मीडियावर जॅकलीनवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केलीये. 

व्हायरल झाला फोटो

श्रीदेवी यांच्या निधनामुळे त्यांचे फॅन्स शोकाकुल झाले असतानाच जॅकलीनचा हसतानाचा फोटो व्हायरल झाला. त्यानंतर लोकांनी टीकेची झोड सुरु केली. 

जॅकलीनला लोकांनी दिला सल्ला

श्रीदेवीच्या निधनानंतर बॉलीवूडवर देशातील श्रीदेवींचे तमाम फॅन्स शोकसागरात बुडाले होते. यावेळी जॅकलीनचा हसतानाचा फोटो व्हायरल झाल्याने लोकांनी अशा प्रसंगी तु जाऊ नयेस असा सल्ला दिला. 

पंचतत्वात विलीन झाली श्रीदेवी

बॉलीवूडची सुपरस्टार श्रीदेवी बुधवारी पंचतत्वात विलीन झाली. श्रीदेवींवर विलेपार्ले येथील सेवा समाज येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पती बोनी कपूर यांनी त्यांना मुखाग्नी दिला.