...म्हणून लक्ष्मीकांत बेर्डेंच्या चित्रपटात मिलिंद गवळी यांनी अभिनय करायला दिला नकार

Milind Gawali Post: अभिनेते मिलिंद गवळी हे कायमच आपल्या सोशल मीडियावर पोस्टसाठी चर्चेत असतात. आई कुठे काय करते, या मालिकेसाठीही त्यांची लोकप्रियता अफाट आहे. परंतु सध्या त्यांच्या या पोस्टनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jun 27, 2023, 07:10 PM IST
...म्हणून लक्ष्मीकांत बेर्डेंच्या चित्रपटात मिलिंद गवळी यांनी अभिनय करायला दिला नकार  title=
June 27, 2023 | Actor Milind Gawali refuses to act with laxmikant berde in a film because of villan role

Milind Gawali Post: 'आई कुठे काय करते' या मालिकेमुळे घराघरात पोहचलेला अभिनेता म्हणजे मिलिंद गवळी. अनिरूद्ध या भुमिकेमुळे ते चांगलेच प्रकाशझोतात आलेले आहेत. गेली चार वर्षे ही मालिका सुरू आहे त्यामुळे या मालिकेची चांगलीच चर्चा रंगलेली असते. मिलिंद गवळी सोशल मीडियावरही फार सक्रिय असतात. त्यामुळे त्यांचीही चांगलीच चर्चा रंगताना दिसते. ते अनेकदा सोशल मीडियावर आपली पोस्ट शेअर करताना दिसतात. सध्या त्यांची अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यावेळी त्यांनी एका पोस्टमध्ये विनोदाचे बादशहा लक्ष्मीकांत बेर्डे यांचा उल्लेख केला आहे. त्यांच्याविषयी त्यांनी या पोस्टमध्ये नक्की काय लिहिलंय, चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या या पोस्टबद्दल! सध्या त्यांची ही पोस्ट चांगलीच गाजते आहे. 

काय लिहिलंय पोस्ट? 

“मी स्मिता जयकर “ पुस्तक पुण्यात प्रकाशित झालं. नियती कसा खेळ खेळत असते बघा, एखाद्या व्यक्तीची आपल्याला नियतीला जर भेट घालून द्यायची असेल तर कशीही काहीही करून ती व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये येतेच येते, पंचवीस तीस वर्षांपूर्वी रमेश साळगावकर नावाचे दिग्दर्शक माझ्याकडे “सत्वपरीक्षा” नावाचा सिनेमा घेऊन आले होते, या चित्रपटांमध्ये मला त्यांनी एक भूमिकेचा आग्रह केला होता, लक्ष्मीकांत बेर्डे हिरो, रेशम टिपणीस हीरोइन आणि मला व्हिलन चा रोल त्यांनी ऑफर केला होता, मी विलन आहे म्हणून मी तो रोल स्वीकारला नाही आणि तो चित्रपट केला नाही, या चित्रपटामध्ये स्मिता जयकर त्या विलनच्या आईची भूमिका करत होत्या, त्यांना भेटायची त्यांच्याबरोबर काम करायची संधी माझी गेली.

त्यांची आणि माझी भेट व्हायचीच होती म्हणून सात आठ वर्षानंतर देवकी चित्रपटांमध्ये त्यांनी पाहुणी कलाकार म्हणून एक दिवसाचं काम केलं. ईतक्या वर्षांने नियतीने आमची गाठ घालून दिली, पण फक्त काही तासांसाठी, फार ओळख ही झाली नाही आमची, मग दहा एक वर्षानंतर अर्चना नेवरेकर फाउंडेशनच्या सांस्कृतिक कला दर्पण कार्यक्रमांमध्ये आम्ही नाटक आणि सिनेमा याचे परीक्षक म्हणून एकत्र आलो.

“देव बाभळी” “अनन्या” अशी सुंदर सुंदर नाटक एकत्र बसून बघितली , त्या नाटकांवर चर्चा केली योग्य त्या लोकांना बक्षीस दिली, या सगळ्या प्रवासामध्ये आमची एक छान निखळ मैत्री ही झाली, नियती कसा खेळ खेळते बघा , “सत्व परीक्षा” मध्ये मला विलन चा रोल दिला होता म्हणून मी तो स्वीकारला नव्हता पण आजच्या तारखेला अनिरुद्ध देशमुख सारखा विलन मी सलग तीन वर्ष करतो आहे आणि डोक्याचा भुगा झाला असल्याने ते डोकं ठिकाणावर ठेवण्यासाठी स्मिताजीच मला सातत्याने मदत करतात.

या वाल्याचा वाल्मिकी होण्याचा मार्ग स्मिताजींच्या through जातो आहे का ? कदाचित नियतीलाच माहीत असेल. या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्याच्या आकलनाच्या पलीकडच्या आहेत. फक्त मला एवढेच माहित आहे किंवा मला जाणवतं आहे की स्मिता जी असामान्य आहेत Divine आहेत.. तुम्ही नशीबवान असाल तर कदाचित तुमच्या आयुष्याच्या प्रवासामध्ये त्या तुम्हाला कधीतरी भेटतील पण. स्मिता जयकर हे त्यांनी पुस्तक लिहिलंय त्या पुस्तकाद्वारे कदाचित तुम्ही त्यांना ओळखायचा जाण्याचा प्रयत्न करू शकता” 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्यांच्या या पोस्ट खाली अनेक कलाकारांनीही कमेंट केली आहे. नुकतंच ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता जयकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे. यावेळी या पुस्तक प्रकाशन सोहळ्या अभिनेता मिलिंद गवळी यानं हजेरी लावली होती. त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री स्मिता जयकरही दिसत आहेत. या व्हिडीओ त्यांनी स्मिता जयकर यांच्याबद्दलचा एक किस्सा सांगितला आहे.