वयाच्या 52 व्या वर्षी अभिनेत्याने पुन्हा बांधली लग्नगाठ; फोटो शेअर करत म्हणाले...

अभिनेत्याने पत्नीबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही

Updated: Oct 15, 2022, 04:26 PM IST
वयाच्या 52 व्या वर्षी अभिनेत्याने पुन्हा बांधली लग्नगाठ; फोटो शेअर करत म्हणाले... title=

टीव्ही अभिनेता राजीव पॉल (Rajeev Paul) हे दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकले आहेत. स्वतः राजीव पॉल यांनी आपल्या लग्नाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. राजीव पॉल (Rajeev Paul) यांचे पहिले लग्न टीव्ही अभिनेत्री डेलनाज इराणीसोबत (Delnaaz Irani) झाले होते. 2012 मध्ये या जोडप्याचा घटस्फोट झाला होता. आता घटस्फोटाच्या 10 वर्षानंतर राजीव पॉलने दुसरे लग्न केले आहे.

वयाच्या 52 व्या वर्षी पुन्हा बांधली लग्नगाठ

टीव्ही अभिनेता राजीव पॉल यांचा (Rajeev Paul) पहिला विवाह अभिनेत्री डेलनाज इराणीसोबत (Delnaaz Irani) झाला होता. त्यांचे लग्न सुमारे 14 वर्षे टिकले. त्यानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आता वयाच्या 52 व्या वर्षी पुन्हा एकदा राजीव यांनी लग्न केले आहे. राजीव यांनी आपल्या लग्नाचा पहिला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोवर राजीव यांचे चाहते आणि सेलिब्रिटी त्याचे अभिनंदन करत आहेत.

सर्वांसाठी आनंदाची बातमी म्हणत राजीव पॉल यांनी आपल्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे.  राजीव यांच्या या फोटोवर त्यांचे चाहते त्यांचे अभिनंदन करत आहेत. याशिवाय वधू कोण आहे याचा सस्पेन्सही कायम आहे. राजीव यांच्या या फोटोवर पत्नीचा चेहरा दाखवा, अशा कमेंट आल्या आहेत.  राजीव यांनी या पोस्टमध्ये कुठेही आपल्या पत्नीबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rajev Paul (@rajevpaul)

डेलनाझ आणि राजीव पॉल दोघेही 1993 मध्ये परिवर्तन या मालिकेच्या सेटवर भेटले होते. या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी 1998 मध्ये लग्न केले. पण हे लग्न फार काळ टिकले नाही आणि 2010 मध्ये दोघे वेगळे राहू लागले. लग्नाच्या 14 वर्षानंतर दोघांनी 2012 मध्ये घटस्फोट घेतला. याशिवाय काही काळापूर्वी डेलनाज तिचा बॉयफ्रेंड पर्सीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या आल्या होत्या. पर्सी डेलनाजपेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. डेलनाझ आणि पर्सीच्या नात्याची सुरुवात मैत्रीपासून झाली. दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दरम्यान, पर्सीने डेलनाजला प्रपोजही केल्याची बातमी आली होती.