महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात 18 नवे चेहरे; अनेक दिग्गजांचा पत्ता कट

Maharashtra Cabinet : नागपुरात राजभवनात मंत्रीमंडळाचा शपथविधी पार पडला. महायुतीच्या एकूण 39 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यात अनेक तरुण चेह-यांना संधी देण्यात आली आहे. नव्या चेह-यांचा मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला आहे.

वनिता कांबळे | Updated: Dec 15, 2024, 11:47 PM IST
महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात 18 नवे चेहरे; अनेक दिग्गजांचा पत्ता कट title=

Maharashtra Cabinet Expansion : अखेर फडणवीस सरकारचा बहुप्रतिक्षीत मंत्रीमंडळ विस्तार पार पडलाय. एकूण 39 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. 33 आमदारांनी कॅबिनेट म्हणून तर 6 जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अनेक जुन्या चेह-यांना डच्चू देण्यात आलाय, तर अनेक नव्या चेह-यांचा मंत्रीमंडळात समावेश करण्यात आलाय. 

भाजपकडून मंत्रीमंडळात तब्बल 8 नव्या चेह-यांचा समावेश करण्यात आला आहे. नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले,  अशोक उईके, संजय सावकारे, आकाश फुंडकर,  माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर, पंकज भोयर, भाजप, यांचा समावेश आहे
शिवसेनेकडून एकूण 11 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामध्ये 5 नव्या चेह-यांचा समावेश करण्यात आलाय. यामध्ये,संजय शिरसाट, प्रताप सरनाईक,  भरत गोगावले, आशिष जैस्वाल, प्रकाश आबिटकर यांचा समावेश आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसकडून 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. 9 पैकी तब्बल 5 नवे चेहरे देऊन अजितदादांनी अनेक जुन्या मंत्र्यांना डच्चू दिलाय. राष्ट्रवादीच्या नव्या चेह-यांमध्ये माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील, इंद्रनील नाईक, बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी यांचा समावेश आहे

फडणवीस सरकारच्या नव्या मंत्रीमंडळात तब्बल 18 नवे चेहरे असणार आहेत. नव्या सरकारमध्ये नवे चेहरे घेऊन महायुती राज्याचा गाडा हाकणार आहे. खातेवाटपानंतर कुणाला कुठलं खातं मिळतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. नवे चेहरे नवी दिशा देतील, हीच अपेक्षा.