मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यमुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. त्याचा बायोपिक 'संजू' बद्दल बरेच विवाद होते, त्याची एक लव्हस्टोरी अशी आहे, ज्याबद्दल लोक अद्याप जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.माधुरी दीक्षितसोबत अधूरी प्रेमकथा संजय दत्तच्या जीवनाचा तो भाग आहे, याबद्दल संजय दत्तने अनेक चॅट शोमध्ये खुलेपणाने सांगितलं आहे, मात्र माधुरीने या नात्यावर कायमच मौन बाळगलं.
'रॉकी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारा संजय दत्त आपल्या लूक आणि खास स्टाईलने बॉलिवूडचा नवा स्टार बनला होता. 90च्या दशकात संजय दत्त बॉलीवूडच्या चांगल्या नायकांपैकी एक होता. त्याचवेळी माधुरीने 'अबोध' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 80च्या दशकात दोघंही त्यांच्या कारकीर्दीच्या उंचीवर पोहचले होते.
'साजन' सिनेमाच्या दरम्यान सुरु झाली संजय माधुरीची लव्हस्टोरी
'तेजाब' आणि 'दिल' सारख्या चित्रपटांनी माधुरीला प्रेक्षक आणि बॉक्स ऑफिसने पहिला क्रमांक दिला. याच दरम्यान 'साजन' सिनेमाचं काम सुरू झालं, ज्याने या लव्हस्टोरीचं पहिल पान गिरवलं या चित्रपटात संजय आणि माधुरी व्यतिरिक्त सलमान खानसुद्धा आहे. मुख्य भूमिकेत असलेले माधुरी दीक्षित आणि संजय दत्त हे खऱ्या आयुष्यात एकमेकांच्या प्रेमात पडले.
संजयच्या लग्नानंतरही माधुरी प्रेमात पडली
सेटवर दोघेही गुपचुप एकमेकांसोबत वेळ घालवायचे, तर दुसरीकडे संजय दत्तचं लग्न माधुरी आणि संजयसाठी त्रासदायक बनू लागली होती, त्यावेळी संजयला एक मुलगी होती या सगळ्या गोष्टींची पर्वा न करता दोघांनीही 'खलनायक' चित्रपटात साइन केला.
खलनायक चित्रपटामुळे आले जवळ
'खलनायक' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमधील प्रेम आणखी खास बनू लागलं, पण या दरम्यान, अशी बातमी समोर आली की, माधुरीच्या कुटूंबाला संजय दत्त आणि त्यांच्या नात्याबद्दल आक्षेप आहेत, तर संजयच्या पत्नीलाही या नात्याबद्दल समजलं होतं. .... त्याची पत्नी भारत सोडून गेली होती. ती आपल्या मुलीसह अमेरिकेत शिफ्ट झाली. यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला.
संजय दत्तच्या अटकेमुळे झालं ब्रेकअप
जेव्हा संजय दत्तला आर्म्स एक्ट अंतर्गत अटक केली गेली. त्यावेळी संजय दत्त आणि माधुरी दीक्षित रिलेशनशिपमध्ये होते. संजय दत्तने एक-दोन नव्हे तर 16 महिने तुरूंगात घालवले, दरम्यान, त्याचा 'खलनायक' हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि तो खूप हिट ठरला.
संजयपासून माधुरी लांब होण्याचं कारण
संजय दत्त जेव्हा कठीण काळातून जात होता. तेव्हा माधुरीने त्याला पाठिंबा दिला नाही. संजय 16 महिने तुरूंगात होता मात्र माधुरी संजयला एकदाही भेटायला गेली नाही. आणि हेच या नात्याचा दूर होण्यामागचं कारण होतं. कुटुंबाच्या दबावामुळे माधुरीलादेखील संजयपासून दूर गेली.