'छोटा बच्चा बना गँगस्टर' कंगनाने आलिया भट्टवर साधला निशाणा

कंगनाने आलियाचा आगामी 'गंगुबाई काठियावाडी' चित्रपटावर निशाणा साधला आहे.

Updated: Apr 23, 2021, 10:22 AM IST
'छोटा बच्चा बना गँगस्टर' कंगनाने आलिया भट्टवर साधला निशाणा

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना  रानौत कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. सामाजिक, राजकीय, चालू घडामोडींवर किंवा एखाद्या व्यक्तीवर निशाणा साधत आपलं मत मांडत असते. तर आता कंगनाच्या जाळ्यात अभिनेत्री आलिया भट्ट अडकली आहे. कंगनाने आलियाचा आगामी 'गंगुबाई काठियावाडी' चित्रपटावर निशाणा साधला आहे. शिवाय तिचा 'थलायवी' चित्रपट  सर्वात आधी रूपेरी पडद्यावर दाखल होईल त्यानंतर डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचं देखील कंगनाने सांगितलं. 

इन्स्टाग्रामवर स्टोरीमध्ये कंगना म्हणाली, 'थलायवी चित्रपटाचे डिजिटल अधिकार फक्त अमेझॉन (तामिळ) आणि नेटफ्लिक्स (हिंदी)कडे आहेत. थलायवी' चित्रपट  सर्वात आधी रूपेरी पडद्यावर दाखल होईल त्यानंतर डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार. अफवा पसरवणाऱ्यांवर सक्त कारवाी केली जाईल.' असं देखील कंगना म्हणाली. 

पुढे तिने आलिया आणि तिच्या आगामी चित्रपटावर निशाणा साधला, 'चित्रपटाच्या ट्रेलरवर टीका करण्यात आली. अभिनय  देखील काही खास नाही. चित्रपटात छोटा बाळाला गँगस्टरची भूमिका देण्यात आली आहे.' असं म्हणत तिने आलियाच्या 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटावर निशाणा साधला.