Siddhant Chaturvedi मुळे ईशान खत्तर आजही सिंगल? खुद्द सिद्धांतने सोडलं मौन

ईशान खत्तरनं धडक या चित्रपटातून तर सिद्धांतनं गल्ली बॉय या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. 

Updated: Sep 5, 2022, 02:25 PM IST
Siddhant Chaturvedi मुळे ईशान खत्तर आजही सिंगल? खुद्द सिद्धांतने सोडलं मौन  title=

Siddhant Chaturvedi: सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खत्तर बॉलीवूडमध्ये आल्या आल्या प्रेक्षकांचे लाडके झाले आहेत. कधी काळी सीएची परीक्षा देणारा सिद्धांत चतुर्वेदी आता बॉलीवूडचा मोठा स्टार झाला आहे. दोघांनी बॉलीवूडमध्ये डेब्यू केले आणि दोघेही समीक्षकांच्या आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. ईशान खत्तरनं धडक या चित्रपटातून तर सिद्धांतनं गल्ली बॉय या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. 

सोशल मीडियावर या दोघांची चांगलीच चलती आहे. त्यामुळे त्यांच्या प्रोफेशनल लाईफप्रमाणे त्यांच्या पर्सनल लाईफबद्दलही सगळीकडे चर्चा असते. मध्यंतरी ईशान खत्तर अनन्या पांडेला डेट केल्याचं बोलले गेले होते. त्यानंतर त्या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांनाही उधाण आले होते. लॉकडाऊनमध्ये त्यांचा कालीपिली हा सिनेमा ओटीटीवरती आला होता. 

परंतु ईशान प्रमाणे सिद्धांतच्या लव लाईफबद्दलही अनेक चर्चांना उधाण आले होते पण अखेर त्याने आपल्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल असलेले मोैन अखेर सोडलं आहे. बुथ पोलिस या त्याच्या आगामी ईशान खत्तर आणि कतरिना कैफसोबतच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो करण जोहरच्या लोकप्रिय शोमध्ये आला होता. यावेळी त्यानं आपण सिंगल असल्याचं जाहीर केलं असलं तरी त्याचसोबत आणखीनं एक खुलासा केला आहे. 

करण जोहरनं तिघांनाही म्हणजे ईशान, सिद्धांत आणि कतरिनाला त्यांच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल विचारले तेव्हा सिद्धांतनं पाहिलं उत्तर दिलं त्यावर तो म्हणाला, मी स्वतः सिंगल आहे आणि माझ्यासोबत ईशान असताेच त्यामुळे माझ्यासोबत राहून राहून तोही सिंगल झाला राहिला आहे. या उत्तरवर सगळेच हसले. या शोमध्ये ईशाननही आपण सिंगल असल्याची कबूली दिली. 

गमतीत चाललेल्या या गप्पांमध्ये ईशान आणि सिद्धार्थनं आपल्या सिंगल असण्याचे रहस्य उघड केले.