अभिनेता विकास समुद्रे ब्रेन हॅम्रेजमुळे रुग्णालयात

अभिनेता विकास समुद्रे यांना मीरारोड येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय

Updated: Jan 15, 2018, 08:49 PM IST
अभिनेता विकास समुद्रे ब्रेन हॅम्रेजमुळे रुग्णालयात  title=

प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, मुंबई : अभिनेता विकास समुद्रे यांना मीरारोड येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय..ब्रेन हॅम्रेज झाल्यामुळे  विकासला त्याच्या मित्रांनी तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवले.

विकासची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्यामुळे उपचार करायचे कसे असा प्रश्न कुटुंबिय आणि मित्रांपुढे उभा राहिलाय. विकासच्या उपचारासाठी विविध संस्था आणि नाट्य-सिनेसृष्टीतील लोकांनी पुढे यावं असं आवाहन त्याचा मित्रपरिवार आणि कुटुंबियांकडून करण्यात आलंय. ज्यांना विकासला मदत करायची आहे त्यांनी ९९६७३८०३९९ या क्रमांकावर संपर्क साधावा.