मुंबई : अभिनय क्षेत्रात आज अशा कैक अभिनेत्री आहेत ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीचा प्रवास अर्ध्यावरच सोडला. कौटुंबीक कारण असो किंवा आणखी काही, प्रसिद्धीझोतात असतानाच या अभिनेत्रींनी कलाजगताला रामराम ठोकला. असं करण्यामागे काही मोठी कारणंही होती.
चित्रपटांच्या मागण्या, कुटुंब आणि बरंच काही या कारणांमध्ये समाविष्ट होतं. सध्या अशाच एका अभिनेत्रीनं तिच्या पतीनं केलेल्या अजब मागणीचा उलगडा सर्वांसमोर केला आहे.
प्रसिद्धी, चांगले चित्रपट सारंकाही मिळत असतानाच तिला असा सल्ला किंवा तिच्याकडे त्यानं अशी मागणी नेमकी का केली?
आयुष्यभराच्या जोडीदाराकडून अशी मागणी होणारी ही अभिनेत्री आहे, अमृता राव. तिनं एका मुलाखतीत काही गोष्टी स्पष्ट केल्या.
'हे खरं आहे. कारण, त्यावेळी अनमोल पाहू शकत होता की मी बरेच मोठे चित्रपट नाकारत होते. कारण मला किसिंग सीन किंवा लवमेकिंग सीन करण्यात अजिबातच सहजपणा जाणवत नव्हता. त्यामुळं त्यानं विचार केला की ही वेळ नातं खुलवण्यास आणि वैयक्तीक आयुष्यावर लक्ष देण्यास योग्य आहे. पण, दोन- एक महिन्यांमध्ये त्याला ही मागणीच चुकीची वाटली आणि त्यानं माझी माफी मागितली', असं ती म्हणाली.
अमृतानं तिच्या कारकिर्दीत फार चित्रपट केले नाहीत. पण, तिनं ज्या भूमिका साकारल्या त्या मात्र सर्वांची मनं जिंकून गेल्या. मुख्य मुद्दा असा, की आता हीच अमृता तिचा पती, आणि खास मित्र अनमोल याच्यासोबत मिळून त्यांच्या नात्याचा प्रवास सर्वांच्या भेटीला आणताना दिसत आहे.