'ग्रॅन्ड मस्ती' फेम अभिनेत्री लग्नापूर्वीच गरोदर; फोटो व्हायरल

 ब्रूनाने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक फोटो शेअर करत आनंदाची बातमी दिली आहे

Updated: May 13, 2019, 12:00 PM IST
'ग्रॅन्ड मस्ती' फेम अभिनेत्री लग्नापूर्वीच गरोदर; फोटो व्हायरल title=

मुंबई : बॉलिवुडमध्ये अनेक विदेशी मॉडेल आणि अभिनेत्री काम करत असतात. काहींना बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली तर काही मॉडेल्स, अभिनेत्रींना तितकीशी प्रसिद्धी मिळाली नाही. परंतु अभिनेत्री ब्रूना अब्दुल्लाहला प्रसिद्धीही मिळाली आणि कामही. बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारपासून ते विवेक ओबेरॉयपर्यंत अनेक अभिनेत्यांसह ब्रूनाने काम केलं आहे. नुकतंच ब्रूनाने सोशल मीडियावरुन एक पोस्ट करत तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. 

ब्रूना ब्राझीलची असून तिने आई बनणार असल्याची बातमी शेअर केली आहे. ब्रूनाने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली. गेल्या वर्षी जुलै महिन्यात ब्रूनाने तिच्या ब्रिटिश बॉयफ्रेन्ड एलान फ्रेजरसह साखरपुडा केला होता.

एका मुलाखतीतही ब्रूनाने ती पाच महिन्यांची गरोदर असल्याचं सांगतिलं होतं. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर बेबी बंपचा फोटो शेअर केला होता.

bruna abdullah

ब्रूनाने बॉलिवुडपासून ते साउथ फिल्म इंडस्ट्रीपर्यंत काम केलं आहे. ब्रूनाने टेलिव्हिजनवरील अनेक कॉमेडी शोमध्ये सुत्रसंचालन केलं आहे. 'आय हेट लव स्टोरी', 'ग्रॅन्ड मस्ती', 'मस्तीजादे' चित्रपटातही तिने काम केलं आहे. टेलिव्हिजनवरील रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी' आणि 'नच बलिए'च्या सहाव्या सीजनमध्येही तिने सहभाग घेतला होता. गेल्या वर्षी आलेल्या 'उडनछू' चित्रपटातही तिने भूमिका साकारली होती.