Naagin Season 7 मध्ये बिग बॉस 16 मधील 'ही' अभिनेत्री होऊ शकते पुढची 'नागिन'? कधी होणार प्रदर्शित?

एकता कपूरच्या 'नागिन 7' या सीझनची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. अशातच आता या सीझनच्या लॉन्चिंग संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित? 

Soneshvar Patil सोनेश्वर पाटील | Updated: Sep 18, 2024, 01:03 PM IST
Naagin Season 7 मध्ये बिग बॉस 16 मधील 'ही' अभिनेत्री होऊ शकते पुढची 'नागिन'? कधी होणार प्रदर्शित?  title=

Naagin Season 7 : टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय कार्यक्रमांपैकी 'नागिन' मालिका एक आहे. या मालिकेच्या कथा आणि कथानकाने प्रेक्षकांना टीव्हीच्या पडद्यावर जोडून ठेवण्यात एकता कपूर यशस्वी झाली आहे. तिचा शो नेहमीच टीआरपी चार्टमध्ये टॉपवर राहिला आहे. आत्तापर्यंत 'नागिन'चे 6 सीझन प्रचंड हिट झाले आहेत. आता चाहत्यांना तिच्या 7व्या सीझन उत्सुकता लागली आहे. 

रिपोर्टनुसार, एकता कपूरच्या 'नागिन 7' ची लॉन्च डेट समोर आली आहे. चाहते देखील 'नागिन 7' च्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

'नागिन 7' टीव्हीवर कधी प्रदर्शित होणार? 

रिपोर्टनुसार, 'नागिन 7' सीझन जानेवारी 2025 मध्ये सुरु होऊ शकतो. परंतु, अद्याप याबाबत निर्मात्यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. एका रिपोर्टनुसार, एकता कपूरच्या आगामी 'नागिन 7' सीझनमध्ये बिग बॉस 16 मधील प्रियांका चहर चौधरी मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची सध्या सोशल मीडियावर अफवा फसरवली जात आहे. 

परंतु, बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, प्रियांका चहर चौधरीने एकता कपूर हिच्या 'नागिन 7' सीझनमध्ये सामील झाल्याच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत. मात्र, अशा परिस्थितीत 'नागिन 7' च्या सीझनमध्ये कोण नागिन असेल हे पाहण्यासाठी चाहते देखील खूप उत्सुक आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

टीव्हीवरील एकता कपूरचा 'नागिन 6' हा सीझन सर्वात मोठा होता. या सीझनमध्ये अभिनेत्री मौनी रॉय आणि अर्जुन बिजलानी मुख्य भूमिकेत होते. आत्तापर्यंत 'नागिन'ने 6 सीझन पूर्ण केले आहेत. तेजस्वी प्रकाश अभिनीत 'नागिन 6' हा सीझन केवळ धमाकाच नाही तर तो आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि हिट सीझन होता. बिग बॉस 15 च्या विजेत्या तेजस्वी प्रकाशने सहाव्या सीझनमध्ये सिंबा नागपालसोबत अनेक भूमिका साकारल्या आहेत. 'नागिन 6' हा सीझन 12 फेब्रुवारी 2022 ते 9 जुलै 2023 या कालावधीत प्रसारित झाला होता.

'नागिन'चे सर्व सीझन हिट

सुरुवातीच्या काळात 'नागिन' ही मालिका टीआरपी रेटिंगमध्ये नेहमीच टॉप 10 मध्ये राहिली आहे. मात्र, त्यानंतर या मालिकेच्या रेटिंगमध्ये सतत चढ-उतार होत राहिला. त्यामुळे तो कालावधी मालिकेचा सर्वात मोठा हंगाम ठरला. त्याचबरोबर 'नागिन'चे सर्व सीझन हिट ठरले. चाहत्यांना देखील ते प्रचंड आवडले आहेत. त्यामुळे आता सर्वांनाच एकता कपूरच्या 'नागिन 7' च्या सीझन 7 ची आतुरता लागली आहे.