करीना कपूरची लॉटरी लागली, मिळाला भारतातील सर्वात महागडा चित्रपट!

Kareena Kapoor India's Big Budget Film : करीना कपूर खान करणार भारतातील सगळ्यात महागडा चित्रपट... 

दिक्षा पाटील | Updated: Sep 18, 2024, 12:28 PM IST
करीना कपूरची लॉटरी लागली, मिळाला भारतातील सर्वात महागडा चित्रपट! title=
(Photo Credit : Social Media)

Kareena Kapoor India's Big Budget Film : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान ही लोकप्रिय कलकारांपैकी एक आहे. तिनं आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. करीना सध्या 'द बकिंघम मर्डर्स' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. करीना कपूरनं या चित्रपटात एका डिटेक्टिवची भूमिका साकारली आहे. तर करीना कपूरला एक नवा प्रोजेक्ट मिळाला आहे. करीना कपूरला या सगळ्यात भारतातील सगळ्यात मोठी पॅन इंडिया चित्रपटाची ऑफर मिळाली आहे. तर या चित्रपटाला करीना कपूरनं काही न सांगता होकार दिला आहे. 

'पिंकव्हिला'ची रिपोर्ट समोर आली आहे. त्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की करीना कपूरनं  भारतातील सगळ्यात मोठी पॅन इंडिया फिल्म साइन केली आहे. रिपोर्टनुसार, हा चित्रपट भारतातील सगळ्यात मोठी फीचर फिल्म असणार आहे. या चित्रपटातील थ्रिलर लोकांना खूप आवडणार आहे. या चित्रपटात करीना अशा भूमिकेत दिसणार आहे, जी तिनं तिच्या 25 वर्षांच्या करिअरमध्ये आजवर साकारलेली नाही. करीना या चित्रपटासाठी दिग्दर्शकावर डोळे बंद करीन विश्वास ठेवणार आहे. रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत चित्रपटाच्या नावाचा खुलासा झालेला नाही, पण करीना कपूरनं चित्रपटासाठी लगेच होकार दिला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

दरम्यान, असा दावा करण्यात येत आहे की करीना कपूर तिच्या या चित्रपटाला घेऊन खूप जास्त उत्सुक आहे. पॅन इंडिया चित्रपट असल्यानं यात अनेक बडे कलाकार दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार, करीनासोबत या चित्रपटात अनेक दाक्षिणात्य कलाकार दिसण्याशी शक्यता आहे, त्यामुळे एकत्र बॉलिवूड आणि दाक्षिणात्य प्रेक्षकांचे एकत्र लक्ष वेधण्यात येईल. चित्रपटाला घेऊन आतापर्यंत काही अपडेट मिळालेली नाही. पण दावा असा आहे की दरम्यान, दावा असा करण्यात आला आहे की चित्रपटाचं शूटिंग 2025 मध्ये सुरु होणार आहे आणि 2026 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

हेही वाचा : अनंत अंबानीच्या लग्नात सेलिब्रिटी वऱ्हाड्यांसाठी मोजलेले पैसे? अनन्या पांडेनं सांगितलं सत्य

करीनाच्या करिअरविषयी बोलायचे झाले तर 2000 मध्ये जेपी दत्ता यांच्या 'रेफ्युजी' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात करिअरची सुरुवात केली. तेव्हापासून तिनं 50 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यात 'चमेली', 'कभी खुशी कभी गम', 'ओमकारा', 'जब वी मेट', 'हीरोइन', '3 इडियट्स', 'कुर्बान', 'वी आर फॅमिली', 'उडता पंजाब', 'बजरंगी भाईजान' आणि 'लाल सिंह चड्ढा' सारखे चित्रपट आहेत. दरम्यान, लवकरच ती रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अजय देवगण महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून कलाकारांची भट्टी पाहायला मिळणार आहे.