अंडरवर्ल्ड डॉनच्या प्रेमात पडल्या होत्या या अभिनेत्री, करिअर करुन घेतलं उद्धवस्त

अंडरवर्ल्ड डॉनच्या प्रेमात वेड्या झालेल्या या अभिनेत्रींचे करिअर असं संपलं.

Updated: Jun 8, 2022, 06:04 PM IST
अंडरवर्ल्ड डॉनच्या प्रेमात पडल्या होत्या या अभिनेत्री, करिअर करुन घेतलं उद्धवस्त title=

मुंबई : बॉलीवूड सेलिब्रिटींचे वैयक्तिक आयुष्य आणि नातेसंबंधांमध्ये जाणून घेण्याबाबत प्रत्येकाला  रस असतो. अभिनेत्री त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत अनेकदा अभिनेत्यांच्या प्रेमात वेड्या झालेल्या दिसतात, तर काही क्रिकेटपटू किंवा उद्योगपतींना त्यांचा जीवनसाथी म्हणून निवडतात. पण आज आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत, ज्या अंडरवर्ल्ड डॉनच्या प्रेयसी बनल्या.

अंडरवर्ल्ड डॉनच्या प्रेमात पडणाऱ्या अनेक अभिनेत्रींच्या प्रेमाच्या कहाण्या प्रसिद्ध आहेत. त्यातील काहींनी लग्न केले तर काही तुरुंगात गेले. अंडरवर्ल्डच्या प्रेमात या नायिकांचं करिअर उद्ध्वस्त झालं.

या यादीत पहिले नाव आहे अभिनेत्री मोनिका बेदीचे. मोनिका बेदी आणि अबू सालेम यांची प्रेमकहाणी चांगलीच गाजली होती. अबू सालेमच्या प्रेमात हरवलेल्या मोनिका बेदीने आपली कारकीर्द धोक्यात आणून तुरुंगाची हवा खाल्ली.

अनिता अयुबचे नाव दाऊद इब्राहिमसोबत जोडले गेले. दोघांमध्ये खूप जवळचे संबंध होते. त्याच वेळी, रिपोर्ट्समध्ये या दोघांच्या नात्याबद्दल असंही सांगण्यात येत आहे की एकदा जावेद सिद्दीकी यांनी अनिताला आपल्या चित्रपटात कास्ट करण्यास नकार दिला होता. त्यानंतर दाऊदने जावेद सिद्दिकीची हत्या केली.

राम तेरी गंगा मैली या चित्रपटात आपल्या बोल्डनेसची जादू पसरवून लोकांना वेड लावणाऱ्या मंदाकिनीच्या अभिनयाने दाऊद इब्राहिमही प्रभावित झाला होता. दोघेही एका सामन्यादरम्यान एकत्र दिसले होते. अभिनेत्रीने दाऊदसोबतचे नाते नाकारले होते.

ममता कुलकर्णी हे अल्पावधीतच बॉलीवूडमधील प्रसिद्ध नाव बनले होते. पण एका चुकीच्या नात्याने तिचे करिअर कायमचे उद्ध्वस्त झाले. तिचे संबंध अंडरवर्ल्डच्या विकी गोस्वामीसोबत होते. ममताने विकीशी लग्न केले. त्याचवेळी, एकदा ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी अभिनेत्रीला अटकही केली होती.

या यादीत अभिनेत्री सोनाचाही समावेश आहे. डॉन हाजी मस्तान पहिल्याच नजरेत तिच्या प्रेमात पडला होता, असं म्हटलं जातं. त्यानंतर सोना आणि डॉनने एकमेकांशी लग्न केले. पण लग्नानंतर लगेचच हाजी मस्तानच्या मृत्यूनंतर अभिनेत्री एकाकी पडली.