मुंबई : सलीम खान (Salim Khan) यांना मिळालेल्या धमकीच्या पत्रानंतर सलमान खानने (Salman Khan) याप्रकरणी पोलिसांकडे आपला जबाब नोंदवला आहे. कोणावरही संशय घेण्याचे कारण नाही, असे त्याने म्हटलं आहे. या पत्रामागे कोण आहे हे त्यांना माहीत नाही. सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर (Sidhu moose wala Murder) सलमान खानचे वडील सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आले होते. या पत्रासंदर्भात पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई (lawrence bishnoi) आणि गोल्डी ब्रार (goldy brar) यांची चौकशी केल्याचे वृत्त आहे. या पत्राशी त्यांचा काहीही संबंध नसल्याचे लॉरेन्सचे म्हणणे आहे.
सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईचे नाव समोर आल्यानंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. धमकीचे पत्र आल्यानंतर पोलीस अधिक सतर्क झाले आहेत. आता या प्रकरणी सलमान खानलाही विचारण्यात आले की, त्याला कोणावर संशय आहे का? (mumbai police record salman khan statement)
टाईम्सनाऊच्या वृत्तानुसार, सलमान खान म्हणाला की, मला कोणावरही संशय घेण्याचे कारण नाही. लॉरेन्स बिश्नोई किंवा गोल्डी ब्रार यांच्यावर संशय आहे का, असे विचारल्यावर सलमान म्हणाला, “मी लॉरेन्स बिश्नोईला इतरांप्रमाणेच ओळखतो. मी गोल्डी बारला ओळखत नाही.
सलमान खानचे वडील सलीम खान देखील म्हणतात की, धमकी देणारे पत्र कोणी पाठवले हे माहित नाही. लॉरेन्सबद्दल सलीम खान सांगतात की, 'त्यांचे कुटुंब लॉरेन्स बिश्नोईला ओळखते कारण त्याचे नाव यापूर्वीच्या कट प्रकरणात आले होते. इतर कोणीही त्याच्या कुटुंबाला कधीही धमकावले नाही.'