तैमुर-जेहला सोडून एकटी कुठे निघाली Kareena? आजूबाजूच्या लोकांनीही अडवलं पण... Video Viral

परंतु आपल्या मुलांचा सांभाळ करताना दिसत असलेली करिना मात्र आता आपल्या मुलांना सोडून कुठेतरी गेलेली दिसली.

Updated: Oct 3, 2022, 02:02 PM IST
तैमुर-जेहला सोडून एकटी कुठे निघाली Kareena? आजूबाजूच्या लोकांनीही अडवलं पण... Video Viral  title=

Kareena Kapoor Khan Spotted Video: करिना कपूरचा लाल सिंग चड्ढा (Laal Singh Chaddha) हा चित्रपट सपशेल फ्लॉप ठरला त्यानंतर करिना लाईमलाईटमध्ये फारशी दिसली नाही. त्याचसोबत करिना मात्र आपल्या मुलांसाठी सतत वेळ काढताना दिसत होती. (actress kareena kapoor leaves for airport but fans stops her for clicking selfies video viral)

परंतु आपल्या मुलांचा सांभाळ करताना दिसत असलेली करिना मात्र आता आपल्या मुलांना सोडून कुठेतरी गेलेली दिसली. यावेळी तिचा हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. (Kareena Kapoor Viral Video)

करिना नुकतीच एअरपोर्टवर स्पॉट झाली. ( Kareena Kapoor Spotted) ती तिथं येताच तिच्या अवतीभोवती लोकांचा गराडा वाढू लागला. सेल्फी घेण्यासाठी तिच्या पाठीमागे तिचे चाहते लागले तेव्हा करिना वैतागली. 

करिनाला फोटोग्राफर्स नेहमीच ती कुठेही बाहेर गेली तर तिला घेरतातच, परंतु आपल्या चाहत्यांसोबत आणि फोटोग्राफर्ससोबत करिना नेहमीच चांगला व्यवहार करताना दिसते. पण यावेळी मात्र करिना तिच्या फॅन्सवर चांगली भडकली. (Kareena Kapoor Angry)

यावेळी जेव्हा करिना गाडीतून उतरली तेव्हाच तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी एकच गर्दी झाली होती. तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी सगळेच तिच्या पाठीमागून पुढे जात होते जेणेकरून तिच्यासोबत सेल्फी काढता येईल. (Kareena Kapoor Spotted at Airport)

सेल्फी काढताना तिच्यासोबत लोकांनी धक्काबुक्कीही केली. या धक्काबुक्कीत तिची पर्सही खाली पडली. परंतु या गर्दीतून मार्ग काढत करिना त्यांच्यातून बाहेर आली.

समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कोणीतरी करिनाचा हात खेचत आहे. व्हिडीओमध्ये करीना (Kareena Kapoor Viral Video) सुद्धा खूप रागावलेली दिसत आहे आणि ती तिथून पळून जाण्याचाही प्रयत्न करत आहे पण तिच्या मागे तिचे वेडे चाहते आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटझिन्सनी आपल्या प्रतिक्रया दिल्या आहेत ज्यात त्यांनी सेलिब्रिटींसोबत वागू नये असे म्हटले आहे. (Video Viral on Social media)

 
 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यादरम्यान करीना कपूरचा एअरपोर्ट लूकही (Kareena Kapoor Airport Look) चर्चेत आहे. करीना कपूर एअरपोर्टवर ऑल व्हाइट लूकमध्ये दिसली. कपिनाने पांढऱ्या स्वेटरसह पांढरा शर्ट घातला होता. यासोबतच करीना व्हाईट ट्राउजर आणि व्हाइट स्नीकर्समध्ये अतिशय स्टायलिश स्टाईलमध्ये दिसली. करिनाने हलका मेकअप आणि सनग्लासेसने तिचा लूक पूर्ण केला.