अजबच! ज्या दगडाला डोअरस्टॉपर समजलं; 'तो' निघाला 8.49 कोटींचा कुबेरचा खजिना

अनेकदा आपण अशा गोष्टी घरात वापरत असतो. ज्याचा अंदाज आपल्याला नसतो. तसाच अंदाज या महिलेला नव्हता. जी चक्क 8.49 कोटी रुपयांचा खजिना डोअरस्टॉपर म्हणून वापरत होती. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Dec 23, 2024, 04:12 PM IST
अजबच! ज्या दगडाला डोअरस्टॉपर समजलं; 'तो' निघाला 8.49 कोटींचा कुबेरचा खजिना  title=

अनेकदा असं होतं की, आपलं नशिब आपल्यासाठी बरंच काही देत असतं. पण त्याचा अंदाज आपल्याला नसतो. असाच एक प्रकार एका महिलेसोबत घडला आहे. ज्या दगडाचा वापर तिने अनेकवर्षांपासून दरवाजा अडवण्यासाठी डोअरस्टॉपर असा केला आहे. तो एक सामान्य दगड नसून चक्क खजिना निघाला आहे. 

हे प्रकरण आहे रोमानिया येथील एका छोट्याशा गावत राहणाऱ्या वृद्ध महिलेचं. एक महिला एम्बर नगेटला डोअरस्टॉपर म्हणून वापरत असे. अनेक वर्षांपासून ही महिला त्या दगडाला अतिशय सामान्य समजत होती. मात्र तो निघाला करोडोंचा खजिना. स्थानिक मीडिया एल पेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, बुझूच्या प्रांतीय संग्रहालयाचे संचालक डॅनियल कोस्टाच यांनी या महिलेला नगेटची खरी किंमत सांगितली होती. त्यानंतर ते पोलंडमधील क्राको येथे पुष्टीकरणासाठी पाठवण्यात आले. जिथे तज्ञांनी पुष्टी केली की ते 3.85 ते 7 कोटी वर्षे जुने आहे.

ज्यांनी दिला त्यांचा 1991 साली मृत्यू 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by World Record Academy (@worldrecordacademy)

प्रसारमाध्यमांशी बोलताना वृद्ध महिलेने सांगितले की, तिला ते एका लोकलमधून मिळाले होते आणि ज्या महिलेने ते दिले होते तिचे 1991 मध्ये निधन झाले होते. या दगडाविषयी डॅनियल कोस्टाच म्हणाले की, वैज्ञानिक आणि संग्रहालय या दोन्ही स्तरांवर त्याचा शोध खूप महत्त्वाचा आहे. ती महिला म्हणाली की, आता मला खूप आनंद झाला आहे की माझ्याकडे एवढा मौल्यवान खजिना आहे कारण काही दिवसांपूर्वी माझ्या घरी चोरी झाली होती. परंतु हे रत्न चोरांच्या नजरेत आले नाही.

एका अहवालानुसार, रोमानियामध्ये काही सर्वात श्रीमंत अंबर ठेवी आहेत, ज्यांना बोली भाषेत 'नदी रत्ने' म्हणतात. भूगर्भशास्त्रज्ञ ऑस्कर हेल्म यांनी या ठेवींना रुमानीट किंवा बुझौ एम्बर असे नाव दिले आहे. या भागात निसर्ग राखीव मौल्यवान 'अंबर' सापडला. जुनी स्ट्राम्बा अंबर खाण, जी एकेकाळी खूप मौल्यवान होती, मात्र मागणी आणि किमती कमी झाल्यामुळे सरकारने बंद केली होती.