मी उत्तम नव्हतेच; चाळीशीतल्या बाळंतपणानंतर असं का म्हणतेय अभिनेत्री?

एका नव्या आयुष्याला पालवी फुटण्याचे हे क्षण 'आई' अर्थात जन्मदात्रीला अनन्यसाधारण महत्त्व देऊन जातात

Updated: Aug 30, 2021, 06:08 PM IST
मी उत्तम नव्हतेच; चाळीशीतल्या बाळंतपणानंतर असं का म्हणतेय अभिनेत्री?  title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : बाळंतपण म्हणजे एका स्त्रीचा जणू पुनर्जन्म. एका नव्या आयुष्याला पालवी फुटण्याचे हे क्षण 'आई' अर्थात जन्मदात्रीला अनन्यसाधारण महत्त्व देऊन जातात. नऊ महिने पोटात गर्भ धारण केल्यानंतर जेव्हा आई बाळाला जन्म देते तेव्हा तिच्या मनात असंख्य भावना दाटून आलेल्या असतात. सध्या एका अभिनेत्रीच्या मनात अशाच भावना दाटून आल्या आहेत एका अभिनेत्रीच्या मनात. 

नुकत्याच एका मुलाला जन्म देणारी ही अभिनेत्री आहे, किश्वर मर्चंट. (Kishwer Merchant) तिनं, इन्स्टाग्रामवरुन आपल्या बाळासोबतचा एक फोटो शेअर करत, हा अनुभव शब्दांत मांडला आहे. अभिनेता सुयश राय याच्यासोबत विवाहबंधनात अडकल्यानंतर किश्वरनं वयाच्या 40 व्या वर्षी एका बाळाला जन्म दिला. तिच्या या प्रवासामध्ये इथवरचा पल्ला गाठणं इतकंही सोपं नव्हतं. किंबहुऩा आपण या साऱ्यादरम्यान कधीच उत्तम नव्हतो, असंही तिनं कबुल केलं आहे. 

मी उत्तम नव्हतेच... 
किश्वरनं इन्स्टाग्रामवर बाळाचा आणि तिचा फोटो पोस्ट करत लिहिलं, 'माझा Bugs Bunny, मला ठाऊक आहे यामध्ये खूप अडचणी आल्या.  मी नव्हते यामध्ये उत्तम. सी सेक्शन, पेन किलर (औषधं), थकवा, ताणतणाव आणि स्तनपान.... मी नव्हते उत्तम. पण जसं की आपण दर दिवशी एकमेकांना वचन देतो, आपण दोघंही या प्रवासात एकमेकांना मदत करु आणि परिस्थिती एकमेकांसाठी सुंदर बनवू.... खूप सारं प्रेम माझ्या बाळा.' 

किश्वर आणि सुयश हे टेलिव्हिजन जगतातील एक सुप्रसिद्ध सेलिब्रिटी कपल आहे. रिलेशनशिपपासून ते लग्नापर्यंतचा त्यांचा प्रवास हा अनेकांनाच हेवा वाटेल असा होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात स्थान मिळवणारी ही जोडी किश्वरच्या गरोदरपणाच्या काळातही याच माध्यमातून फॉलोअर्सपर्यंत अनोख्या पद्धतीनं ही जोडी पोहोचत होती.