दु:ख विसरुन मुलीसाठी मंदिरानं उचललं 'हे' पाऊल; वाचा तिची भावनिक पोस्ट

आघातातून सावरत मंदिरा आता एक नवी सुरुवात करु पाहत आहे

Updated: Jul 28, 2021, 03:19 PM IST
दु:ख विसरुन मुलीसाठी मंदिरानं उचललं 'हे' पाऊल; वाचा तिची भावनिक पोस्ट
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री मंदिरा बेदी हिच्या जीवनात काही दिवसांपूर्वीच एक वादळ आलं. एकाएकी तिच्या पतीच्या निधनानंतर जीवनात अनेक गोष्टी बदलल्या. पण, या आघातातून सावरत मंदिरा आता एक नवी सुरुवात करु पाहत आहे. यामध्ये तिला साथ मिळतेय ती म्हणजे तिच्या पालकांची आणि मुलांची. 

Add Zee News as a Preferred Source

आयुष्यभराचा जोडीदार अशी अर्ध्यावरच साथ सोडून गेलेला असताना याच दु:खातून सावरणाऱ्या मंदिरानं एक महत्त्वाचा निर्णय घेतला. हा निर्णय म्हणजे मुलीचा वाढदिवस साजरा करण्याचा. तारा, ही मंदिरानं दत्तक घेतलेली मुलगी. तिच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त मंदिरानं एक भावनिक पोस्ट लिहित लेकीला या खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

पॉर्नोग्राफी व्यवसायात राज कुंद्रा याची कशी झाली एंट्री, या गुपिताचा पडदा उठला

लेकिच्या वाढदिवसानिमित्तची पोस्ट लिहित मंदिरा म्हणते, '28 जुलै, आजच्याच दिवशी एक वर्षभरापूर्वी तू आमच्या आयुष्यात आलीस. गोड तारा... आजही आम्ही तुझ्या असण्याचा आनंद साजरा करत आहोत. आज तुझा पाचवा वाढदिवस आहे, माझ्या बाळा माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे....'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)

पतीच्या निधनानंतर बदललं मंदिराचं आयुष्य 
मंदिराचे पती, चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून नावाजलेल्या राज कौशल यांनी जून महिन्यात अखेरचा श्वास घेतला. राज कौशल यांच्या निधनानं मंदिरा पुरती कोलमडली होती. अशा परिस्थितीत अनेक मित्रमंडळी आणि चाहत्यांनीही तिला आधार दिला. आपल्या वाट्याला आलेल्या याच सदिच्छांच्या बळावर आता ती जीवनाच्या एका नव्या प्रवासाची सुरुवात करु पाहत आहे. 

About the Author