धक्कादायक : कर्करोगामुळे बॉलिवूड अभिनेत्रीचं निधन

मृत्यूपूर्वी सोशल मीडियावर तिने एक भावूक पोस्ट केली. 

Updated: Jul 13, 2020, 11:44 AM IST
धक्कादायक : कर्करोगामुळे बॉलिवूड अभिनेत्रीचं निधन

मुंबई : 'है अपना दिल तो आवारा' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात राज्य करणारी बॉलिवूड अभिनेत्री दिव्या चौकसेने कर्करोगामुळे अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ती कर्करोगीशी झुंज देत होती. अखरे १२ जुलै रोजी तिची कर्करोगासोबतची झुंज संपली. भोपाळ येथे तिचा मृत्यू झाला आहे. दिव्याच्या मृत्यूची बातमी तिच्या चुलत बहिणीने फेसबुकच्या माध्यमातून दिली. 

'मला ही बातमी सांगताना अत्यंत दुःख होत आहे की, माझ्या बहिणीने कमी वयात या जगाचा निरोप घेतला आहे. ती एक उत्तम मॅडेल होती. शिवाय तिने अनेक चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये काम केले आहे. आज ती आम्हाला सोडून गेली आहे. देव तिच्या आत्म्याला शांती दोवो.' अशी पोस्ट तिच्या चुलत बहिणीने केली. 

महत्त्वाचं म्हणजे खुद्द दिव्याला देखील तिच्या मृत्यूची चाहूल लागली होती, 'मला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मी आता बोलू देखील शकत नाही. मी जीवनाच्या दुसऱ्या प्रवासासाठी त्रास सहन करत आहे.  मी माझ्या मृत्यूशय्येवर आहे.' मृत्यूपूर्वी सोशल मीडियावर तिने अशी भावूक पोस्ट केली.